मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, चिठ्ठी वाचून गाव हळहळलं

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचा बळी गेला आहे. परभणी जिल्ह्यातील जितूर तालुक्यातल्या भोशी गावात राहणाऱ्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

मोठी बातमी! मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, चिठ्ठी वाचून गाव हळहळलं
Ganesh Thombre
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 10:17 PM

मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात येत असल्याच्या विवंचनेतून जिंतूर तालुक्यातील भोशी गावात राहणाऱ्या गणेश ठोंबरे या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी गणेशने चिठ्ठी लिहीत, आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे.  तसेच  सरकारने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी देखील त्याने केली आहे.

दरम्यान  या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून,आत्महत्येपूर्वी गणेश मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नैराश्येत होता. अनेकदा त्याने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे पाटलांना वेळोवेळी उपोषण का? कराव लागते, असा प्रश्न देखील मित्र मंडळी आणि नातेवाईकांकडे केला होता. या प्रश्नावरून अनेकदा मित्र आणि नातेवाईकांकडून गणेशची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र आरक्षण मिळणारचं नाही, हा मुद्दा गणेशच्या मनात एवढ्या खोल घर करून बसला होता की, अखेर गणेशने आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचललं अशी माहिती गणेशच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करून देखील आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, यामुळे गणेशला नैराश्य आलं होतं. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान  सरकारने आता मराठा आरक्षणाचा मार्ग कायमचा मोकळा करून द्यावा. अशी मागणी गणेशच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

काय आहे मनोज जरांगे यांचा आरोप? 

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिली आहे. कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा बांधवाच्या गाठी भेटी सुरू आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us