Fact Check : गरजू रुग्णांना अक्षय कुमारकडून खरंच 25 लाखांची मदत? वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य

व्हाट्सअ‍ॅपवर गरजू रुग्णांच्या मदतीबाबतचे अनेक मेसेज फिरत असतात (Fact Check is Akshay Kumar help 25 lakh rupees to patients for treatment).

Fact Check : गरजू रुग्णांना अक्षय कुमारकडून खरंच 25 लाखांची मदत? वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 2:21 PM

मुंबई : व्हाट्सअ‍ॅपवर गरजू रुग्णांच्या मदतीबाबतचे अनेक मेसेज फिरत असतात. सध्या अभिनेता अक्षय कुमार यांचा उल्लेख करुन मंत्रालयात ग्राम वैद्यकीय साहायता निधीचा कक्ष उघडण्यात आल्याची माहिती सांगणारा मेसेज फिरत आहे. या मेसेजमध्ये गरजू रुग्णांना 25 लाखांपर्यंतची मदत दिली जाते, अशी माहिती देण्यात आली आहे. व्हाट्सअ‍ॅपवर फिरणारा हा मेसेज खरा आहे की खोटा, याची पडताळणी आमच्या ‘टीव्ही 9 मराठी’ टीमने केली. मात्र, पडताळणीत हा मेसेज फेक असल्याचं निषपन्न झालं (Fact Check is Akshay Kumar help 25 lakh rupees to patients for treatment).

व्हायरल होणारा मेसेज नेमका काय?

“सुपरस्टार अक्षय कुमार यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात “ग्राम वैद्यकीय सहायता निधी” या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 25 लाखांपर्यंत मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता”, असं व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. याशिवाय या मेसेजमध्ये देण्यात आलेला नंबर हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी असल्याचं आमच्या पडताळणीत समोर आलं.

खरं काय?

व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये देण्यात आलेल्या फोन नंबरवर आम्ही फोन केला. अक्षय कुमार यांनी खरंच अशी काही योजना सुरु केली आहे का? याबाबत चौकशी केली. मात्र, समोरुन फोनमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारा मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय तो नंबर मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा असल्याचं त्यांनी सांगितली. आम्ही फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव विचारलं. मात्र, त्या व्यक्तीने आपलं नाव सांगण्यास नकार दिला. आम्हाला नाव सांगण्यास परवानगी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून रुग्णांना मदत

मुख्यमंत्री साहाय्याता निधीच्या कार्यालयातून बातचित करणाऱ्या व्यक्तीने व्हाट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये अर्धसत्य असल्याचं स्पष्ट केलं. कॅन्सर, बायपास, अँजोप्लास्टी सारख्या मोठ्या ऑपरेशनचा खर्च मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दिला जातो. यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा फॉर्म भरुन कार्यालयात जमा करावे लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ज्या रुग्णाला मदत हवीय त्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आणि रेशन कार्ड, आधारकार्ड आवश्यक असेल, असं देखील सांगितलं. त्यामुळे आपच्या पडताळणीत अक्षय कुमारच्या नावाने व्हायरल होणारा मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट झालं (Fact Check is Akshay Kumar help 25 lakh rupees to patients for treatment).

हेही वाचा : ‘शॅडो’चेही ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, राज ठाकरेंच्या सहकुटुंब बैठकीवर सरदेसाईंचा निशाणा

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.