AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीआर आला! मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, आरक्षणाबाबत तातडीने उचललं पाऊल; नेमका आदेश काय?

मराठा समाजासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी तातडीने मोठं पाऊल उचललं आहे. जाणून घ्या नेमका आदेश

जीआर आला! मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, आरक्षणाबाबत तातडीने उचललं पाऊल; नेमका आदेश काय?
maratha reservation Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 3:18 PM
Share

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे मागील 18 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. त्यातच जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईच्या दिशेने जात असतानाच फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयाने आरक्षणाचा मराठा समाजाचा मार्ग मोकळा होणार आहे. फडणवीस सरकारच्या निर्णय मराठा समाजासाठी दिलासादायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रशासकीय इमारतीतील ऊर्जा विभागाचं कार्यालय संदीप शिंदे समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यासंदर्भातील कामकाज नव्या प्रशासकीय इमारतीतून चालणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या अर्जदारांना कुणबी नोंदी शोधणे सोपे जाणार आहे.

सरकारचा नवा जीआर जशाच तसा

नवीन प्रशासन भवन इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील पश्चिम बाजू येथील ऊर्जा विभागाला वाटप करण्यात आलेली 964.44 चौ. फुट (प्रत्यक्षात 775 चौ. फुट) जागा आता निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती व मराठा आरक्षण कक्षास वाटप करण्यात येत आहे. या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील पश्चिम बाजू येथील राज्य निवडणूक आयोग (रोखशाखा) यांना वाटप केलेली पंरतू ताबा न घेतलेली 400 चौ. फुट इतकी ऊर्जा विभागास वाटप करण्यात येत आहे. तसेच या जागेच्या बाजूस गृह विभागाच्या ताब्यातील 1103 चौ. फुट इतक्या जागेपैकी या विभागाच्या अभिलेखावरुन 845.59 चौ. फुट जागा गृह विभागाची असल्याने 846 चौ. फुट इतकी जागा गृह विभागाच्या ताब्यात ठेवून उर्वरित 257 चौ. फुट इतकी जागा ऊर्जा विभागास वाटप करण्यात येत आहे. यानुसार निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती व मराठा आरक्षण कक्ष यांचे कामकाजाचा कालावधी संपल्यानंतर सदर जागेचा ताबा पूर्ववत ऊर्जा विभागाकडे राहील.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच