फडणवीस म्हणताय ते 100 टक्के खरं, ही पवारांचीच खेळी होती- शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा खुलासा

राज्याच्या राजकारणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता शिंदे गटाच्या खासदाराने देखील दावा केला आहे.

फडणवीस म्हणताय ते 100 टक्के खरं, ही पवारांचीच खेळी होती- शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा खुलासा
| Updated on: Feb 14, 2023 | 2:26 PM

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना खळबळजनक वक्तव्य केलं होतं. पहाटेचा शपथविधी हा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या सहमतीनेच झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. वेगवेगळे पक्षाचे नेते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. यावर आता शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे.

‘देवेंद्र फडणवीस १०० टक्के बरोबर’

‘ही सत्य गोष्ट आहे. आम्हाला हे माहित होतं. राजकारणात माहिती ठेवावी लागते. ही पवारांनीच केलेली खेळी होती. त्यांची पंरपरा सगळ्यांना माहित आहे. फडणवीस जे म्हणताय ते १०० टक्के खरं आहे. असा दावा देखील शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय.

कोर्टाचा निर्णय आमच्याच बाजुनेच लागणार. मेजोरिटी आमच्याच बाजुने लागणार याबाबत कुठे ही शंका नाही. कायद्यानुसार निकाल आमच्याच बाजुने लागणार आहे.

‘दहा आमदार आमच्या संपर्कात’

दहा आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. अडचणीमुळे ते समोर येऊ शकत नाहीत. पण ते म्हणतात आम्ही तुमच्यासोबत आहे.ठाकरे गटाकडे ५ आमदार उरतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते

देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘उद्धव ठाकरे यांची काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरु होती. तेव्हा आमच्याकडे ऑफर आली स्टेबल गर्व्हमेंट स्थापन करण्याची. जी काही चर्चा झाली ती शरद पवार यांच्यासोबत झाली होती.  आधी गोष्टी ठरल्यानंतर त्या नंतर कशा बदलल्या हे नंतर सगळ्यांनी पाहिलं आहे.’

Follow us
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.