AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू मागच्या जन्मीची नागीण… अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार, व्हिडीओ रेकॉर्ड आणि.. , 3 भोंदू बाबांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू बाबांच्या कारनाम्यांनी महिलांचे लैंगिक, आर्थिक आणि मानसिक शोषण उघड झाले आहे. सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांनी अंधश्रद्धेचा बुरखा फाडला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होत असून, अशा फसवणुकीपासून सावध राहणे आवश्यक आहे.

तू मागच्या जन्मीची नागीण... अल्पवयीन मुलीला फसवून अत्याचार, व्हिडीओ रेकॉर्ड आणि.. , 3 भोंदू बाबांवर गुन्हा दाखल
सांगली क्राईम
| Updated on: May 26, 2026 | 9:51 AM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे कारनामे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. महिलांना फसवून, त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अशोक कराडने अनेक महिलांचे कित्येक वर्ष लैंगिक शोषण केलं, तसेच त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक देखील केल्याते उघड झाले. तपासातून त्याचे नवनवे कारनामे, त्याने केलेली फसवणूक याचे तपशील बाहेर आल्यावर अख्खा महाराष्ट्र हादरला. त्यानंतर अशा अनेक भोंदू बाबांचे कारनामे आणि त्यांचे चाळे, त्यांची फसवणूक उघड झाल्याने मोठी खळबळ माजली.

अशीच एक धक्कादायक घटना आता सांगलीजवळ घडली आहे. ‘ तू मागच्या जन्मीची नागीण आहेस’ असे सांगून विट्यातील ‘कडेश्वर धाम’च्या तिघा भोंदूंबाबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही भोंदू बाबांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे.

काय घडलं नेमकं ?

महापुरुषांचा संचार असल्याचं सांगत शरीरिक व आर्थिक फसवणूक करणाऱ्या सांगलीच्या विटा येथील तिघा भोंदूकडुन एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक, खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी तिघांवर विटा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीला,तू मागच्या जन्मी नागिण होतीस, आणि संकेतबाबा नाग होता, त्यामुळे या जन्मी लग्न व्हावं म्हणून तुझा जन्म झाला असं त्यांनी त्या मुलीला सांगितलं. तिचा गैरफायदा घेत तिघांनी तिच्यावर अत्याचार तर केलाच पण त्यांची विकृती एवढ्यावरच थांबली नाही.

व्हिडीओही केला रेकॉर्ड 

तीनही आरोपींनी या अत्याचाराचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. एवढच नव्हे तर हा व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी त्या तिघांनी पीडित मुलीला दिली आणि वारंवार अत्यातर केले. तसेच पीडित मुलीच्या वडिलांकडून पूजा व हवन करण्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी अटकेत असणाऱ्या भोंदू महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकमआणि सूरज उपाध्ये या तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत आणि आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा पोलीसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल