AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good News: रब्बीच्या पेरणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे

रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी, गहू आणि मका बियाणे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत

Good News: रब्बीच्या पेरणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 12:49 PM
Share

नाशिकः कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी हरभरा, रब्बी ज्वारी, गहू आणि मका बियाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

अनुदानित बियाण्याचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले शेतकरी तसेच लक्षांकपूर्तीसाठी ऑफलाइन पद्धतीने शेतकरी निवडून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात हरभरा 8016 क्विंटल, गहू 3290 क्विंटल, ज्वारी 70 क्विंटल व मका 433 क्विंटल इतक्या अनुदानित बियाण्यांचे तालुकानिहाय वितरणासाठी नियोजन करण्यात आले आहे. 10 वर्षे आतील प्रमाणित हरभरा बियाणे (फुले विक्रम, RVG -202) साठी प्रति किलो रुपये 25 अनुदान, रब्बी मका पिकासाठी रुपये 95 प्रति किलो किंवा किमतीच्या 50 टक्के अनुदान, रब्बी ज्वारी रुपये 30 प्रति किलो अनुदान तसेच ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत हरभरा (फुले विक्रम, RVG-202, जॅकी-9218) साठी प्रति किलो रुपये 25 अनुदान, गहू (फुले समाधान, लोकवन व एच.डी.2189) पिकासाठी प्रति किलो रुपये 16 अनुदान या प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यंत्रणेकडील वितरकांमार्फत तालुकास्तरावर परमिटद्वारे वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रासाठी अनुदानित बियाण्याचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व 7/12 उताऱ्याच्या झेरॉक्स प्रतीसह तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून परमिट मिळवून अनुदानित बियाण्यांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.

बियाणांच्या किमती वाढल्या एकीकडे खरिपात अतिवृष्टीने झोडपून काढले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे आता रब्बी पेरण्याच्या तोंडावर बियाणांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे. कांदा रोपाची टंचाईही जाणवते आहे. कांदा रोपालाही बियाणांचा पर्याय आहे. मात्र, त्यांच्याही किमती साधरणतः दहा हजार रुपयांना पायली आहेत. त्यामुळे सरकारने कांदा बियाणे किंवा रोपावरही अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. असा निर्णय झाल्यास त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे. (Farmers in Nashik district will get seeds on subsidy for rabi sowing)

इतर बातम्याः

कांदा करणार वांदा, आयातीला शेतकरी संघटनेचा विरोध; व्यापारी-आडत्यांना धडा शिकवण्याचा इशारा 

नाशिकच्या HDFC बँकेत 1 कोटी 4 लाख 45 हजारांचा घोटाळा; 31 शेतकऱ्यांना गंडा, पोलिसांची भूमिका संशयास्पद

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.