AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन, महिला बेशुद्ध, परभणीत चक्क…

शक्तिपीठ महामार्गाला परभणीत जोरदार विरोध होताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. आम्हाला शक्तीपीठ महामार्गाचा फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन, महिला बेशुद्ध, परभणीत चक्क...
Parbhani movement
| Updated on: Feb 23, 2026 | 2:23 PM
Share

परभणी गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटीवर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन तासांपासून शेतकऱ्यांचे रास्ता रोको सुरू आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये जमीन मोजणीवेळी मोठी झटापट देखील झाली. यानंतर ग्रामस्थ या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलनाला बसले. यावेळी परभणी जिल्हातील अनेक मोठे नेतेही पोहोचले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी परभणीच्या शिंगणापूर पाटीवर सलग 3 तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रास्तारोकोमध्ये खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या सहजपूर जवळा येथील सीमा बागल नावाच्या शेतकरी महिलेला वाढत्या तापमानामुळे भोवळ आली. यावेळी त्यांची दातखिळ ही बसल्याचं बघायला मिळालं.

सीमा बागल यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आल आहे. 4 मार्च रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाबद्दल बोलताना खासदार संजय जाधव यांनी म्हटले की, शेतकरी वडीलोपार्जित जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायला तयार नाहीयेत.

शेतीवर शेतकऱ्यांची उपजीविका आहे, पैसे काय शेतकरी खाणार आहेत का? शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकायच्या नाहीत. सहजपूर जवळा येथे जमीन मोजणीवेळी शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. महसूल आणि पोलीस प्रशासनाने सहजपूर जवळ शेतकऱ्यांवर अत्याचार केले. भाजपला काही घेणं नाही देणं नाही, यांना केवळ यांचा हेतू साध्य करायचाय, अडाणी, अंबानी यांच्यासारख्या लोकांच्या मदतीने निवडणुका जिंकत आहेत.

पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेक भूमिका भाजपची देशात सुरू आहे. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे यांना वेळच्यावेळी धडा शिकवा. ही संधीसाधू लोक आहेत, यांची वेळ आली की हे पायापाशी बसणार. काम संपलं की डोक्यावरून लघुशंका केल्याशिवाय राहणार नाहीत. अश्या हरामखोर लोकांना वेळीच रोखण्याची गरज निर्माण झालीय, महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.

मला असे वाटते ज्या अमानुष पद्धतीने तुम्ही वागायला लागलात त्यावरून तुम्ही जनतेच्या मतावर नाहीत तर ईव्हीएम वरूनच निवडून आलात. जनतेच्या मतावर निवडून आले असता तर तुम्ही जनतेचा मताचा आदर केला असता आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द केला असता असेही संजय जाधव यांनी म्हटले.

Follow Us
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी