AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकऱ्यांच आंदोलन पेटलं, पोलिसांकडून महादेव जानकरांची उचलबांगडी; राजू शेट्टी, विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

Farmer Protest : आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांच आंदोलन पेटलं, पोलिसांकडून महादेव जानकरांची उचलबांगडी; राजू शेट्टी, विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात
Farmer ProtestImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 15, 2026 | 4:19 PM
Share

कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे आंदोलन पेटलं आहे. आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा मोर्चा काढू नये यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टींसहीत आंबा बागायतदार ऊत्पादक अध्यक्षांना मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली होती, मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे वर्षा बंगल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन चिघळले आहे.

शेतकरी नेते ताब्यात

आज वर्षा बंगल्याच्या परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलबांगडी करून नेलं. प्रमुख नेते ताब्यात घेतल्यामुळे आता हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

आम्ही मागे हटनार नाही – शेट्टी

पोलिसांनी या मोर्चाला विरोध केल्यानंतर बोलताना शेट्टी म्हणाले होते की, हा मोर्चा होणार म्हणजे होणार आम्ही मागे हटणार नाही. हे आंदोलन आम्हाला करू दिले नाही तर सरकारला त्यांचे परिणाम भोगावे लागतील. आम्हाला अनेक नोटीस आल्या त्याचा फरक पडत नाही. पोलिसांपेक्षा आमची ताकद जास्त आहे. मोर्चा घोषित होऊन 15 दिवस झाले आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती रहायला हवे होते.

आंदोलकांना डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये नेलं

शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तसेच इतरही अनेक नेत्यांना मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तसेच आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. पोलिसांनी ताब्यात घेताना महादेव जानकर यांची उचलबांगडी केली, यावेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आम्ही न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिक्रिया जानकर यांनी दिली आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?