पॉक्सो खटल्यांसाठी पनवेलला ‘फास्टट्रॅक कोर्ट’, पनवेल वकील बार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश

रायगड जिल्ह्यातील पॉक्सो प्रकरणांकरिता पनवेल येथे स्वतंत्र जलदगती (Fasttrack Court For POCSO Cases In Panvel) न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.

पॉक्सो खटल्यांसाठी पनवेलला 'फास्टट्रॅक कोर्ट', पनवेल वकील बार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
pocso court in panvel
Nupur Chilkulwar

|

Mar 15, 2021 | 4:22 PM

पनवेल : रायगड जिल्ह्यातील पॉक्सो प्रकरणांकरिता पनवेल येथे स्वतंत्र जलदगती (Fasttrack Court For POCSO Cases In Panvel) न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. या अगोदर अलिबाग या ठिकाणी हे न्यायालय सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला स्थगिती देऊन पनवेल येते जलदगती न्यायालय सुरु करण्यात येणार आहे (Fasttrack Court For POCSO Cases In Panvel).

पनवेलमध्ये पॉस्को अंतर्गत जास्त गुन्हे

बाल हक्कांबाबतच्या अधिसंधीस 11 डिसेंबर 1992 रोजी भारत सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये बालकांच्या हिताचे संरक्षण करताना सर्व राज्यपक्षकारांनी पालन करावयाची मानके विहित केली आहेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद 15 (3) मध्ये इतर गोष्टींबरोबर बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याकरिता राज्य सरकारला अधिकार दिलेले आहेत.

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या पनवेल परिसराचे नागरीकरण वाढले आहे. या भागाला महान नगराचे स्वरूप प्राप्त होत आहे.परिणामी तुलनेत इतर तालुक्यात पेक्षा पनवेलमध्ये पॉस्को अंतर्गत जास्त गुन्हे दाखल होतात. बाजूला उरण, कर्जत आणि खालापूर तालुका आहेत. पेण, सुधागड हेसुद्धा जवळच आहेत (Fasttrack Court For POCSO Cases In Panvel).

या सर्व पार्श्वभूमीवर न्यायनिवाडे जलद व्हावेत, म्हणून आणि अलिबाग ऐवजी पनवेल येथे पॉस्को कायद्यांतर्गत खटले चालवण्यासाठी जलद गतीने सुरु करण्यात यावे, अशी मागणी पनवेल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी केली होती.

आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार 8 मार्च रोजी या संदर्भात अधिसूचना काढून पॉस्को जलदगती न्यायालय अलिबागऐवजी पनवेल या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल तालुका वकील बार असोसिएशनने स्वागत केले आहे.

Fasttrack Court For POCSO Cases In Panvel

संबंधित बातम्या :

नाणार जमीन व्यवहाराची चौकशी सुरू, जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरू

EXCLUSIVE : तब्बल 9 हजार एकर जागा उपलब्ध, नाणार रिफायनरीला पर्याय सापडला?

नवी मुंबई पोलिसांची भन्नाट कामगिरी,सिलेंडरमधील गॅस चोरणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें