AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची थेट राजस्थानात बदली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; नेमकं सत्य काय?

अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धाडसत्रामुळे तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. त्यांच्या २६व्या बदलीची राजस्थानमध्ये झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. हे खरं आहे का, जाणून घ्या यामागचं सत्य ..

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची थेट राजस्थानात बदली? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ; नेमकं सत्य काय?
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 20, 2026 | 8:26 PM
Share

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात सुरू केलेल्या धाडसत्रामुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. पनीर, आईस्क्रीमसह विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई करण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. FDAने अनेक ठिकाणी छापेमारी करून तेथील स्वच्छतेचा, सुरक्षा मानांकन पाळली जातात की नाही याचाही आढावा घेतला. डॉमिनोज, ब्लिंकइट, इन्स्टामार्टसह,  अनेक कंपन्यांच्या स्टोअर्सवरही छापे मारण्यात आले . तर राज्यातील काही दुकानांचे, आस्थापनांचे परवानेही निलंबित करण्यात आले होते. या कारवायांमुळे FDA आयुक्त आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले.   याच दरम्यान आता सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांच्या 26व्या बदलीबाबत एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंढे यांची महाराष्ट्रातून राजस्थानमधील सीकर येथे बदली झाल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे. या चर्चेमुळे मोठी खळबळ माजली असून प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातही अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, आता खुद्द तुकाराम मुंढे यांनीचं या वृत्ताचे खंडन करत हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केलं आहे.

21 वर्षांत 25 बदल्या

तुकाराम मुंढे हे त्यांच्या शिस्तप्रिय आणि कठोर प्रशासकीय कार्यशैलीसाठी ओळखले जातात. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांच्या तब्बल 25 वेळा बदल्या झाल्याचे सांगितलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या संभाव्य 26व्या बदलीची चर्चा सुरू होताच या दाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध मेसेजिंग ग्रुपवर मुंढे यांची राजस्थानमध्ये बदली झाल्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात होत्या. मात्र, या दाव्याबाबत तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राजस्थानमध्ये बदली झाल्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले.

राजस्थानला बदली झाल्याचा दावा चुकीचा

तुकाराम मुंढे यांची राजस्थानला बदली झाल्याचा दावा करणारी हिंदी भाषेतील पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली. या पोस्टमध्ये त्यांची 26वी बदली राजस्थानमध्ये झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांनी ही पोस्ट शेअर करत राज्य सरकारवरही टीका केली. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ही पोस्ट आणि हा दावा दिशाभूल करणारा आहे. तुकाराम मुंढे यांची राजस्थानमध्ये कोणतीही बदली झालेली नाही. ते महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून सध्या महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

मुंढे म्हणाले, “माझा राजस्थानशी काय संबंध?”

गेल्या दोन दिवसांपासून राजस्थान सरकार किंवा राजस्थान कॅडरमध्ये तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याचे संदेश सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहेत. राज्यात FDAकडून भेसळखोर आणि अस्वच्छ खाद्य आस्थापनांविरोधात सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट व्हायरल झाल्याने चर्चेला अधिक उधाण आलं.

मात्र, बदलीच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केलं. राजस्थानला बदली झाल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “राजस्थानला बदली? माझा राजस्थानशी काय संबंध? मी अशी काही पोस्ट पाहिली नाही आणि राजस्थानला माझी बदली होण्याचे काही कारणही नाही. मी महाराष्ट्र कॅडरचा आहे, माझी महाराष्ट्रातच बदली होऊ शकते,” असे स्पष्ट केलं. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या राजस्थान बदलीची सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा ही अफवा असल्याचे स्पष्ट झालं आहे.

Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?