AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FDA कडून खासगी रुग्णालयांना ‘रेमडेसिव्हीर’ची खैरात, छगन भुजबळांचा खळबळजनक आरोप

FDA अर्थात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून खासगी रुग्णालयांना रेमडेसिव्हीरची खैरात सुरु असल्याचा खळबळजनक आरोप भुजबळांनी केला आहे.

FDA कडून खासगी रुग्णालयांना 'रेमडेसिव्हीर'ची खैरात, छगन भुजबळांचा खळबळजनक आरोप
रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 13, 2021 | 5:37 PM
Share

नाशिक : राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्यासोबतच रेमडेसिव्हीरच्या सुरु असलेल्या काळा बाजारामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील विविध भागात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. अशावेळी अन्न व नागपुरवठामंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर आरोप केलाय. FDA अर्थात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून खासगी रुग्णालयांना रेमडेसिव्हीरची खैरात सुरु असल्याचा खळबळजनक आरोप भुजबळांनी केला आहे. (FDA distributes large quantities of remedisivir injections to private hospitals, Allegation of Chhagan Bhujbal)

86 रुग्ण असलेल्या रुग्णालयाला 1 हजार इंजेक्शन्स!

नाशिकमधील एकाच खासगी रुग्णालयाला 1 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या रुग्णालयात फक्त 86 रुग्ण आहेत. तरीही त्या रुग्णालयाला 1 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स देण्यात आलेत. भुजबळांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात FDA कडून करण्यात आलेल्या असमान वाटपामुळे जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होतोय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी दिलेल्या दणक्यानंतर आता प्रशासन सतर्क झालं आहे. भुजबळांनी आता मायलॉन कंपनी व्यवस्थापनाशी थेट चर्चा केलीय. भुजबळांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये उद्या 7 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळतेय.

‘रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही’

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 10 एप्रिल रोजी केंद्र सरकारवर टीका केली होती. अमूकच लस कशाला हवी? मिळेल ती लस घेऊन देशातील जनतेला द्या ना, लसीचा अट्टाहास करू नका. अरे, माणूस जगला पाहिजे, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच रेमडेसिव्हिर लस काय आमच्या घरी तयार होत नाही, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं होतं.

नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. लंडनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी आपली माणसं जगवण्यासाठी मिळेल त्या लस घेतल्या. अमूकच लस हवी असा अट्टाहास केला नाही. लंडनच्या प्रशासनाने ती लस स्वदेशी आहे की विदेशी आहे हे काहीच पाहिलं नाही, असं सांगतानाच आपल्याकडेही लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तरीही हीच लस घ्या, आपल्याच देशातील लस घ्या असा आग्रह केला जात आहे. अमूकच लस कशाला? अरे, माणूस जगला पाहिजे पहिला. हीच लस घ्या, तीच लस घ्या करू नका. जी लस उपलब्ध असेल ती नागरिकांना द्या, असं भुजबळ म्हणाले. झालं गेलं विसरून आता पुढे गेलं पाहिजे. पुन्हा जोमाने लसीकरण केलं पाहिजे, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं होतं.

संबंधित बातम्या :

Video: नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची परवड, व्हेंटिलेटर बेडसाठी हेळसांड सुरु

नाशकात खासगी हॉ्स्पिटलमधला ऑक्सिजन साठा संपला अन् 30 रुग्णांचा श्वास कोंडला, वाचा नेमकं काय घडलं?

FDA distributes large quantities of remedisivir injections to private hospitals, Allegation of Chhagan Bhujbal

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...