तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका, टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर, 8 ठिकाणी..

एफडीएकडून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यामध्येच आता एफडीएकडून मोठा दणका हॉटेलचालकांना देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरसह मुंबईमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. किचनमधील खाण पाहून अधिकाराही चक्रावले.

तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका, टॉयलेटजवळ भाजी, काळे पडलेले पनीर, 8 ठिकाणी..
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 22, 2026 | 9:12 AM

एफडीएकडून मोठ्या प्रमाणात कारवाई राज्यभरात केली जातंय. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळखोरांना सळो की पळो करून सोडले. त्यातच राज्यात अन्नसुरक्षेबाबत मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बंदी असलेला पानमसाला, गुटखा यांची तपासणी केली गेली. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या स्वयंपाकघरात खराब झालेले पनीर, तळून तळून काळे पडलेले तेल आणि उघड्यावर ठेवलेले अन्न आढळून आले. मुंबईतील मॅकडोनाल्ड्ससह तब्बल 7 आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले. या प्रकरणात काहींना अटकही करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चाैक परिसरात गायत्री मेवाडची प्रायव्हेट लिमिटेड हॉटेलचीही तपासणी करण्यात आली. तुकाराम मुंढे यांचे पथक तिथे अचानक पोहोचले. यादरम्यान पथकाला तिथे खराब झालेले पनीर, उघड्यावर पडलेले अन्न, काळे तेल आणि सफाईमध्ये मोठ्या चुका आढळून आल्या. यानंतर त्यांचा परवाना थेट रद्द करण्यात आला. पथकाला भाजी तयार करताना खराब पनीर आढळून आले.

ज्यात घाण वासही येत होता. मोठ्या प्रमाणात तिथे भाजीकरिता ग्रेवी तयार करून ठेवण्यात आली होती. हेच नाही तर धक्कादायक म्हणजे टॉयलेटजवळ भाजा कापल्या जात होत्या. टॉयलेटमध्येही घाणीचे साम्राज्य होते. नूडल्स एका भांड्यात तसेच पडून होते. तेल वारंवार वापरले जात होते. स्वयंपाक घरात मोठ्या प्रमाणात माश्या होत्या. यापूर्वीही हॉटेलला नोटीस देण्यात आली होती.

एप्रिल 2025 मध्ये 50 हजारांचा दंड हॉटेलला लावण्यात आला होता. मुंबईतही 7 ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली. गुटख्याच्या प्रकरणात 6 जणांना अटक करण्यात आले. मोठ्या प्रमाणात कारवाया या केल्या जात आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी खाणीचे साम्राज्य बघायला मिळतंय. सध्या होत असलेल्या कारवाया आणि हॉटेलमधील विदारक चिन्ह बघता हॉटेलमध्ये जेवणास जावे की, नाही असा प्रश्न लोकांना पडतोय.

अन्न व औषध प्रशासनाच्या सॅम्पल तपासणीचे रिपोर्ट रखडले आहेत. गेली 4 महिन्यात अन्न-औषध प्रशासनाच्या 90 सॅम्पलपैकी केवळ 8 अहवाल प्राप्त झाले आहेत तर; 72 रिपोर्ट प्रलंबित आहेत. धाराशिव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या सॅम्पलच्या प्रयोगशाळा अहवालाला विलंब होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने 80 सॅम्पल छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. मात्र,आतापर्यंत केवळ 8 सॅम्पलचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us