AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Agarakar: ठरलं तर मग! टीम इंडियाच्या नवीन सिलेक्टरची घोषणा होणार, गंभीरची आगरकरांसाठी एक पोस्ट अन् चर्चा सुरु

Gautam Gambhir: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आता अजित आगरकर यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची आता जोरदार चर्चा होत आहे.

Ajit Agarakar: ठरलं तर मग! टीम इंडियाच्या नवीन सिलेक्टरची घोषणा होणार, गंभीरची आगरकरांसाठी एक पोस्ट अन् चर्चा सुरु
| Updated on: Oct 07, 2026 | 12:43 PM
Share

Gautam Gambhir Post For Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपला आहे, आता यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अजित आगरकरांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. मागील काही काळांपासून ही चर्चा रंगत होती की आगरकरांचा कार्यकाळ संपणार आहे पण आता त्या बातम्या खऱ्या ठरल्याचेही दिसत आहे.

गंभीर यांनी सोशल मीडियावर लिहिले, “प्रिय अजित भाई, तुमच्यासोबत काम करणे हा एक मोठा सन्मान होता. त्या तीन आयसीसी ट्रॉफी तुमच्या या विश्वासाची साक्ष आहेत की संघ नेहमीच प्रथम आला आणि त्याला नेहमीच प्राधान्य दिले गेले. मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की इतिहास तुमच्याबाबत अधिक उदार राहील. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. तुमच्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

गंभीर यांचा संदेश यासाठीही खास आहे, कारण आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय क्रिकेटने तीन मोठ्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्या होत्या. गंभीरने या यशाचे श्रेय केवळ ट्रॉफींच्या संख्येला नव्हे, तर वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघाला प्राधान्य देण्याच्या आगरकरांच्या विश्वासाला दिले.

आगरकरांच्या कार्यकाळात संघ निवडीवर वारंवार चर्चा झाली, काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आणि काही खेळाडूंच्या निवडीवर किंवा वगळण्यावर वादविवाद झाले. पण गंभीरचा विश्वास आहे की, कालांतराने आगरकरांच्या निर्णयांचे मूल्यमापन त्यांच्या निकालांवरून केले जाईल. आगरकरांनी हे पद सोडताच ते पद प्रज्ञान ओझा सांभाळेल, मुख्य निवडकर्ता म्हणून आता प्रज्ञान ओझा जबाबदारी सांभाळताना दिसतील.

अजित आगरकर यांचा कार्यकाळ गाजलेला राहिला, एकामागोमाग एक असे निर्णय घेतले की सर्वांनाच धक्का बसला. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवची टी-२० कर्णधारपदी नियुक्ती करणे. आगरकर यांनी हार्दिकच्या तंदुरुस्तीचा इतिहास, सातत्याने उपलब्ध राहू शकेल अशा कर्णधाराची गरज असल्याने त्याची निवड केली. तर टी-२० विश्वचषक जिंकूनही सूर्यकुमार यादवला संघातून वगळले आणि थेट कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड केली.

Follow Us
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं