AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kamlesh Sawant: आई म्हणाली, मला मारून टाक..; ‘दृश्यम 3’मधल्या गायतोंडेचा कंठ दाटून आला

Drishyam 3: 'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणारे अभिनेते कमलेश सावंत नुकत्याच एका मुलाखतीत आईबद्दल बोलताना भावूक झाले. रुग्णालयात असलेल्या आईचा एक किस्सा सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.

Kamlesh Sawant: आई म्हणाली, मला मारून टाक..; 'दृश्यम 3'मधल्या गायतोंडेचा कंठ दाटून आला
Kamlesh SawantImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 12:48 PM
Share

Drishyam 3: सध्या थिएटर आणि सोशल मीडियावर एकाच चित्रपटाची हवा आहे, ती म्हणजे ‘दृश्यम 3’ची. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. ‘दृश्यम’च्या पहिल्या भागापासून एका अभिनेत्याने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं, ते म्हणजे कमलेश सावंत. मराठमोळे अभिनेते कमलेश सावंत यांनी या चित्रपटाच्या तिन्ही भागात इन्स्पेक्टर गायतोंडेची भूमिका साकारली. ही भूमिका त्यांनी इतकी चोख वठवली की, गायतोंडे म्हणताच प्रेक्षकांच्या डोक्यात तिडिक जाते. पडद्यावर जरी त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत साधे आणि हळवे आहेत. त्यांची हीच भावनिक बाजू नुकत्याच एका मुलाखतीत पहायला मिळाली. ‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत कमलेश सावंत त्यांच्या आईविषयी बोलताना भावूक झाले.

काय म्हणाले कमलेश सावंत?

“आईच्या निधनानंतर माझं व्यायामच बंद झालं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आईचं निधन झालं होतं. ती 24 दिवस व्हेंटिलेटरवर होती. घरी घेऊन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे 3.30 वाजता तिने प्राण सोडले. तरीसुद्धा मी तिला रुग्णालयात घेऊन गेलो होतो. पहिल्यांदा ईसीजीमध्ये काहीच दिसलं नाही. अँजियोप्लास्टीनंतर दोन वर्षांपर्यंत तिने खूप सहन केलं होतं. एकदा मी सकाळी दहा वाजता रुग्णालयात गेलो होतो, तेव्हा ती म्हणाली.. मला मारून टाक. मी विचारलं काय? तर मला रागात म्हणाली, मारून टाक. नंतर तेराव्यानंतर आम्ही तिची डायरी काढली. त्यात तिने बरंच काही लिहिलं होतं आणि खूप डेंजर लिहिलं होतं. मी स्वत:लाच संपवून टाकावं, अशी माझी इच्छा होतेय.. असं त्यात लिहिलं होतं. ती 87 वर्षांची होती. तिला युरीन इन्फेक्शन झालं होतं. माझ्यासाठी फक्त आईच होती, बाकी कोणीच नव्हतं,” असं बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

आईविषयी ते पुढे म्हणाले, “आईचे उपचार सुरू असताना माझ्या चार ते पाच चित्रपटांचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी मी स्वत:कडे नीट लक्षही देऊ शकत नव्हतो. शेजारचे लोकच माझ्यासाठी नाश्ता आणायचे आणि मला बळजबरीने खाऊ घालायचे. पण ज्याची आई व्हेंटिलेटरवर आहे, तो जेवू कसा शकतो? आई असताना मी कधी आजारी पडलो तर ती स्वत: मला जेवण वाढायची. मला ती गोष्ट खूप आवडायची. आज माझी पत्नी माझ्यासाठी हे करते. अशावेळी तिच्यात मला माझी आई दिसते.”

Follow Us
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं