AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा पहिला उमेदवार ठरला, विधानसभेसाठी ‘हा’ शिलेदार रिंगणात

भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे.

अजितदादांचा पहिला उमेदवार ठरला, विधानसभेसाठी 'हा' शिलेदार रिंगणात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2024 | 5:32 PM
Share

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपानं आघाडी घेत रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 99 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या पहिल्या यादीनंतर आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या गोटात देखील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आता कोणत्याही क्षणी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते. दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी जे इच्छूक आहेत, त्यांनी अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवेगिरी बंगल्यावर गर्दी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांनी देखील अजित पवार यांची भेट घेतली आहे. आपल्याला उमेदवारी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले गावित 

‘ मला खूप आनंद झाला आहे, आज पक्षाकडून नवापूर मतदार संघासाठी उमेदवारी मिळाली आहे. अजित पवार यांनी मला अनेक सूचना केल्या आहेत. २४ तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याकरिता सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत. माझे वडील माणिकराव गावित हे केंद्रीय मंत्री होते. त्यांनी सलग 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. त्यामुळे मला अजित पवार यांनी वेळोवेळी मदत केली आहे. काँग्रेस पक्षाचं आव्हान मला वाटत नाही, माझा जनसंपर्क मोठा आहे. आज अजित पवार यांनी अनेक विद्यमान आमदारांना एबी फॉर्म दिला आहे. संविधान वाचवण्यासाठी मी काम करत राहणार असं गावित यांनी म्हटलं आहे.

17 जणांना एबी फॉर्म 

दरम्यान कोणत्याही क्षणी आता अजित पवार गटाकडून उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडून आतापर्यंत 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. यामध्ये 1. संजय बनसोडे 2. चेतन तुपे 3. सुनील टिंगरे 4. दिलीप वळसे पाटील 5. दौलत दरोडा 6. राजेश पाटील 7. दत्तात्रय भरणे 8. आशुतोष काळे 9. हिरामण खोसकर 10. ⁠नरहरी झिरवळ 11. ⁠छगन भुजबळ 12. ⁠भरत गावित 13. ⁠बाबासाहेब पाटील 14. ⁠अतुल बेनके 15. ⁠नितीन पवार 16. ⁠इंद्रनील नाईक 17. ⁠बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा समावेश आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा