दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले, तुकाराम मुंडे वळवणार मोर्चा, बारमधूनच थेट FDA ला फोन..

Tukaram Mundhe Marathi News : अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार तुकाराम मुंडे यांनी आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात भेसळयुक्तांवर कारवाई केली जात आहे. यादरम्यानच तुकाराम मुंडे यांनी एका मुलाखतीमध्ये मोठा खुलास केला.

दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले, तुकाराम मुंडे वळवणार मोर्चा, बारमधूनच थेट FDA ला फोन..
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 09, 2026 | 12:27 PM

राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) सुरू असलेल्या धाडींचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक ठरत आहेत. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी क्रेझ आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार त्यांनी आपल्या हाती घेतल्यापासून जोरदार धाडी राज्यभरात पडत आहेत. भेसळयुक्तांना त्यांनी पळो की सळो करून सोडले. भेसळयुक्त मोठ्या प्रमाणात पनीर, दही, दूध शेतांमध्येच नष्ट करत आहेत. यासोबतच बड्या हॉटेलमधील त्यांनी कारवाई केली. अनालॉग पनीरवर बंदी टाकण्यापासून ते गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यापर्यंत एफडीएकडून होणाऱ्या कारवाईचे काैतुक होत आहे.

तुकाराम मुंडे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मोठा खुलासा केला. तुकाराम मुंडे यांनी मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. तुकाराम मुंडे यांनी म्हटले की, FDA रात्री फोन येतात. दारू पिऊन लोक प्रचंड फोन करतात. दारू पिऊन फोन करून लोक माझा नंबर मागतात. दारूची चव बरोबर नाही, असे सांगितले जाते. FDA ने हेल्पलाईन नंबर जारी केलाय.

त्यावर लोक आपल्या तक्रारी देऊ शकतात. त्यावरच रात्रीच्या वेळी फोन करून लोक दारूची चव बरोबर लागत नाही. दारू चढत नाही, अशा तक्रारी करतात. नाईट शिफ्ट करणारा कर्मचारी माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितले की, सर मला नाईट शिफ्ट नको, सकाळची मिळेल का? मी त्याला बोललो की, अरे उलट रात्री काम कमी असेल, फोन कमी येत असतील.

तो म्हणाला नाही सर लोक रात्री दारू पिऊन फोन करतात, तुमचा नंबर मागतात. पण सध्या कामाचा खूप लोड आहे. दारूच्या कारवाया सुद्धा लाईनमध्ये आहेत, असेही तुकाराम मुंडे यांनी म्हटले. म्हणजे दारूवाल्यांकडेही तुकाराम मुंडे आपला मोर्चा वळवणार आहेत. भेसळयुक्तांची खैर राहणार नाही. तुकाराम मुंडे यांनी हे देखील सांगितले की, त्यांनी दारू कधी पिली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us