AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला कोण कोण हजर? पाहा पाहुण्यांची यादी..

आज संगमनेरमध्ये इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाहसोहळ्याला राजकीय सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.

मुख्यमंत्र्यांपासून ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला कोण कोण हजर? पाहा पाहुण्यांची यादी..
Indurikar Maharaj Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 8:14 PM
Share

आज संगमनेरमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा पार पडत आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह साहिल चिलप यांच्याशी होत आहे. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील चांगलाच चर्चेमध्ये आला होता. इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर चांगलीच टिका झाली होती, दरम्यान त्यानंतर आज आता इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाहसोहळा पार पडत आहे. या विवाह सोहळ्यावर देखील प्रचंड खर्च करण्यात आला आहे. तब्बल 100 एकर जागेवर हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान या विवाहसोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे,  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ,  विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे,  खासदार राजन विचारे, खासदार राजाभाऊ वाझे , खा.भाऊसाहेब वाकचौरे , आ.श्वेता महाले , आ.अमोल खताळ , आ.विठ्ठलराव लंघे , आमदार किरण लहामटे, आ.सत्यजित तांबे , विधानपरिषदेचे आ.विवेक कोल्हे , आ.शरद सोनवणे , जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या सर्व नेत्यांनी हजेरी लावली आहे.

कोण आहे साहिल चिलप

इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह आज साहिल चिलप यांच्याशी होत आहे. साहिल चिलप हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. साहिल चिलप हे  सुनील चिलप यांचे चिरंजीव आहेत. सुनील चिलप हे देखील मोठे उद्योजक आहेत. साहिल चिलप हे सध्या नवी मुंबईत वास्तव्याला आहेत. मात्र त्याचं मुळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे हे आहे. काटेडे येथे देखील त्यांचं अलिशान घर असून, त्यांच्याकडे शेती देखील आहे.  दरम्यान या लग्नसोहळ्यामुळे आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी