IAS तुकाराम मुंढेनंतर FSSAI अॅक्शन मोडवर; ‘स्विगी इन्स्टामार्ट’ला धाडल्या तब्बल 9 नोटिसा

FSSAI action : तुकाराम मुंढे यांच्यानंतर आता FSSAI आक्रमक झाली आहे. FSSAI ने 'स्विगी इन्स्टामार्ट'ला तब्बल 9 नोटिसा पाठवल्या आहेत.

IAS तुकाराम मुंढेनंतर FSSAI अॅक्शन मोडवर; स्विगी इन्स्टामार्टला धाडल्या तब्बल 9 नोटिसा
| Edited By: | Updated on: Jul 12, 2026 | 9:54 AM

राज्यात IAS तुकाराम मुंढे यांच्याकडून भेसळखोरांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न व औषध प्रशासन जोरदार कारवाई करत आहे. मुंढेंच्या विभागाने कारवाई करत अनेकांना ताब्यात देखील घेतलं आहे. तुकाराम मुंढे यांच्यानंतर FSSAI आक्रमक झाली आहे. FSSAI ने खराब अन्न विकल्याप्रकरणी ‘स्विी इन्स्टामार्ट’ला 9 नोटिसा पाठवल्या आहेत. FSSAI च्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

देशातील सर्वोच्च अन्न नियामक संस्था ‘एफएसएसएआय’ने (FSSAI) जलद डिलिव्हरी करणाऱ्या ‘स्विगी इन्स्टामार्ट’चं टेन्शन वाढवलं आहे. ‘एफएसएसएआय’ने तब्बल 9 कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . इन्स्टामार्टद्वारे ग्राहकांना मुदत संपलेली अंडी, सडलेले अन्न, दुर्गंधीयुक्त प्रथिने (व्हे प्रोटीन) आणि अगदी लहान मुलांचे असुरक्षित दुधाचे अन्नपदार्थ पुरवण्यात आले आहे, असा गंभीर ठपका नोटीस ठेवण्यात आलाय.

ग्राहकांनी अनेकदा खराब अन्नाबाबत तक्रार केली होती. परंतु कंपनीने मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यांनी केवळ पैशांचा परतावा (रिफंड) देऊन वेळ मारून नेली. आता तसेच एकदा परत आलेले खराब उत्पादन दुसऱ्या ग्राहकाला पाठवल्याचाही आरोप आहे. या सर्व त्रुटींवर एफएसएसएआयने स्विगी इन्स्टामार्टला लेखी स्पष्टीकरण आणि दस्तऐवजीकरण पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहे. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा ‘अनुपालन अहवाल’ ‘स्विगी इन्स्टामार्ट’कडून मागवण्यात आला आहे. थेट कायदेशीर कारवाईसाठी राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनामार्फत (FDA) कायदेशीर नमुने गोळा केले जात आहे. तसेच कंपन्यांना तातडीने सुधारणा करण्यास भाग पाडण्यासाठी अशा ब्रँड्सची नावे सोशल मीडियावर उघड केली जात आहेत.

तत्पूर्वी, मागील महिनाभरापासून आयएएस तुकाराम मुंढे यांच्याकडून अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळीच्या हॉटस्पॉटवर कारवाई करून साठा जप्त केला जात आहे. त्यानंतर FSSAI कारवाई करून लागल्याने व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. FSSAI आता आणखी कुणावर कारवाई केली जाते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us