मोठी बातमी! गाैतमी पाटील हिला उचलायचे की नाही? चंद्रकांत पाटलांचा थेट फोन, नृत्यांगनाच्या अडचणीत मोठी वाढ, नोटीसही..

नृत्यांगना गाैतमी पाटील हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. अपघात प्रकरण चांगलेच अंगलट येताना दिसत आहे. चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात थेट डीसीपींना फोन केला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

मोठी बातमी! गाैतमी पाटील हिला उचलायचे की नाही? चंद्रकांत पाटलांचा थेट फोन, नृत्यांगनाच्या अडचणीत मोठी वाढ, नोटीसही..
Gautami Patil and Chandrakant Patil
| Updated on: Oct 04, 2025 | 9:22 AM

पुण्यात गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षाचालक कुटुंबिय कारवाईची मागणी करत आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी केली जात आहे. यासोबतच ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पोलिस स्टेशन बाहेर काहीवेळ ठिय्या आंदोलन केले. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची कुटुंबीयांनी पोलिसांकडे मागणी केली. हेच नाही तर रिक्षाचालकाच्या मुलीने गंभीर आरोप करत म्हटले की, सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिली जात नाहीत. गाडीमधून उतरणाऱ्याचा चेहरा दाखवला जात नाहीये.

रिक्षाचालकाची मुलगी थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे पोहोचली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन लावला, ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. चंद्रकांत पाटलांनी थेट गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? असा थेट सवालही केला. डीपीसींना फोनवर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, काय ते गाैतमी पाटीलला उचलायच की नाही?

पुढे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, हो…पण ती गाडी कुणाची तरी आहे ना..रिक्षावाला गंभीर आहे. तुम्ही म्हणाला गाैतमी पाटील गाडीत नव्हती. पण कोणीतरी गाडी चालवत होतं ना..भूत गाडी चालवत होतं? जो कोणी गाडी चालवत होता..त्याला पकडावे लागेल ना…पकडला? केस दाखल केली? ती गाडी कुठे आहे? ती गाडी जप्त करून टाका. गाडीची मालकीन गाैतमी पाटीलला नोटीस द्या.

त्या बिचाऱ्याची मुलगी समोर येऊन बसली आहे. तिला म्हणाव तू असशील गाैतमी पाटील वगैरे पण त्यांचा खर्च तरी कर म्हणाव. तुम्ही लक्ष घाला असे चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना म्हटल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. यानंतर पुणे पोलिसांनी गाैतमी पाटीलला नोटीसही पाठवली. 30 सप्टेंबर रोजी गाैतमी पाटीलच्या रिक्षाचा मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. आता गाैतमी पाटीलला अटक होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.