अमित शाहांना भेटण्यासाठी लोक माझ्याकडे यायचे, आता मात्र…चंद्रकांत पाटलांच्या विधानाची चर्चा!
चंद्रकांत पाटील यांनी मुरलीधर मोहोळ यांच्याविषयी एक विधान केले आहे. अण्णा मंत्री कसे झाले ते समजलेच नाही, असे ते म्हणाले आहेत.

Chandrakant Patil : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना अनेपक्षितरित्या केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं. मोहोळ यांना थेट केंद्रात राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळेल याचा अंदाज तेव्हा कोणालाही आला नव्हता. दरम्यान, आता भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मोहळ यांना मिळालेल्या याच जबाबदारीवर भाष्य केलं. मुरलीधर आता मुरलीधर अण्णा झाले आहेत. आता मलाही अमित शाहा यांना भेटण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलावं लागतं. अण्णा अनपेक्षितरित्या केंद्रात मंत्री झाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
अमितभाईंना भेटण्यासाठी पुर्वी लोक माझ्याकडे पाहायचे
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रथमवर्ष कार्यअहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अण्णा अनपेक्षितरित्या केंद्रात मंत्री झाले. कारण केंद्रात मंत्री व्हायला थोडा वेळ लागतो. अमितभाईंना भेटण्यासाठी पुर्वी लोक माझ्याकडे पाहायचे. मात्र आता मलाही अमितभाईंना भेटण्यासाठी अण्णाला बोलावं लागतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच मुरलीधर आता मुरलीधर अण्णा झाले आहेत. अण्णासाहेब होतील तेंव्हा त्यांना साहेब म्हणू, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मंत्रिपद मिळेल याची कल्पनाच नव्हती
अण्णा केंद्रियमंत्री राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे जबाबदाऱ्या मोठ्या आहेत. मात्र इथल्या लोकांशी नाळ तोडू नये, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी मुरलीधर मोहोळ यांना दिला. तर दुसरीकडे मला केंद्रात मंत्रिपद मिळेल याची कल्पनाच नव्हती. हे सगळं अनपेक्षितरित्या झालं, अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
राज्यात सगळं घडवून आणणारे…
चंद्रकांतदादा म्हणाले मी मंत्री कसा झालो ते कळालं नाही. मलाही नाही कळालं मी कसा मंत्री झालो. झोपेतून उठल्यानंतर नड्डाजींचा फोन आला होता. पण तो त्यांचा फोन होता हेच मला समजलं नव्हतं. राज्यात सगळं घडवून आणणारे इथे (देवेंद्र फडणवीस) बसले आहेत. केंद्रात अमित भाईंसारखे कडक हेडमास्तर मिळाले आहेत. माझ्या पक्षनेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवला, अशा भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या.
आज मला जे काही मिळालं आहे ते…
तसेच मुख्यमंत्र्यांना पुण्याबद्दल माझ्यापेक्षा चार गोष्टी जास्त माहिती असतात. मी काही सांगायला गेलं की ते माझ्यापुढे असतात. देशभरात प्रवास झाला तरीही जीथून मी निवडूण आलो त्यांना जास्त प्राधान्य असणार आहे. आज मला जे काही मिळालं आहे ते पुणेकरांमुळेच मिळालं आहे, अशी कृतज्ञताही मोहोळ यांनी व्यक्त केली. पुण्यात 24 तास खासदारांचे जनसंपर्क कार्यालय सुरू असणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
