खोदा पहाड निकला हिरा ..! घंटागाडी कर्मचाऱ्यांनी एका रात्रीत कचऱ्यातून शोधली लाखोंची डायमंड रिंग; जनसंपर्कातून माणुसकीचं दर्शन
कचऱ्यात हरवलेली लाखो रुपयांची एक डायमंड नाशिक महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी एका रात्रीत शोधली आणि ती त्या रिंगच्या मालकाला परतही केली
नाशिक | 15 नोव्हेंबर 2023 : आजकाल माणुसकी हरवत चालली आहे, असं आपण बरेच वेळा ऐकतो. काही प्रसंगांमधून ते अधोरिखितही होतं. लोकांना अडचणीत सापडलेल्या मदत करण्यालाठी वेळ नसतो, सगळे आपल्यातच बिझी.. त्यामुळे इतरांकडे कोण लक्ष देणार ? त्यामुळे माणुसकी हरवत चालल्याची तक्रा वारंवार कानावर येते. पण आता हेच म्हणणे खोडून काढणारी आणि आश्चर्याचा, एक सुखद धक्का नाशिकमध्य घडल्याचे समोर आले आहे.
तेथे जनसंपर्कातून माणुसकीचचं दर्शन घडललं. कचऱ्यात हरवलेली लाखो रुपयांची एक डायमंड नाशिक महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी शोधली आणि ती त्या रिंगच्या मालकाला परतही केली. त्यांच्या या कृतीने त्या इसमाची दिवाळी तर गोड झालीच पण माणुसकी आणि प्रामाणिकपणा अद्यापही लोप पावला नसून ते गुण कायम असल्याचेही या घटनेतून अधोरेखितही झाले.
निर्माल्याच्या पिशवीत अनावधानाने लाखोंची रिंग गेली आणि एकच पळापळ…
झालं असं की नाशिकचे व्यावसायिक प्रवीण खाबिया व सपना खाबिया या दांपत्याची अंगठी निर्माल्याच्या पिशवीत अनावधानाने गेली. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हा प्रकार घडला. बरं ती काही साधीसुधी अंगठी नव्हे, लाखो रुपयांची रुबी डायमंड रिंग होती. ती अंगठी हरवल्याते लक्षात येताच खाबिया दांपत्य सैरभैर झालं. मात्र वेळ न दवडता प्रवीण खाबिया यांनी नाशिक महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्याशी संपर्क साधला.
या घटनेची दखल घेऊन योगेश कमोद आणि आरोग्य विभागाचे डॉ. आवेश पलोड यांनी तातडीने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. आणी ज्या घंटा गाडीमध्ये रिंग हरवलेली निर्माल्याची पिशवी होती त्या गाडीचा शोध घेतसा. त्यानंतर ते निर्माल्य जिथे टाकण्यात येतं त्या खतप्रकल्पातील हजारो टन कचऱ्यामधून ती रिंग शोधण्याची अवघड मोहीम सुरू केली. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध घेत ती रूबी रिंग अखेर शोधून काढलीच. विशेष म्हणजे शहरातील हजारो टन कचरा संकलित करून तो खत प्रकल्पात प्रक्रियेसाठी नेला जातो. मात्र रात्रभर कर्मचाऱ्यांनी तिथे शोधाशोध करून रिंग शोधली. त्यानंतर ती अंगठी मूळ मालक, प्रवीण खाबिया यांच्याकडे सुरक्षितरित्या सुपूर्त करण्यात आली.
अतिशय मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करून लाखोंची रिंग शोधणाऱ्या त्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा प्रशासनातर्फे सत्कार करून त्यांचं कौतुकही करण्यात आलं.