AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हायरल फोटो प्रकरणात गिरीश महाजनांचं मोठ पाऊल, थेट पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कारवाईची मागणी!

फोटोंमध्ये बदल करून, फोटोंना छेडछाड करून कोणाचे कोणाशीही फोटो जोडले जात आहेत. विवस्त्र फोटो जोडले जात आहेत. मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मी सायबर विभाग तसेच पोलिसांकडे तक्रार केली आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

व्हायरल फोटो प्रकरणात गिरीश महाजनांचं मोठ पाऊल, थेट पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; कारवाईची मागणी!
girish mahajanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2026 | 3:59 PM
Share

Girish Mahajan : भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे कथित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंचा आधार घेत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केला जात आहेत. दुसरीकडे गिरीश महाजन यांनी मात्र संबंधित कथित फोटो खोटे आणि मॉर्फ केलेले आहेत, असे सांगितलेले आहे. दरम्यान, त्यांनी याच प्रकरणावर माध्यमांना आणखी माहिती दिली आहे. त्यांनी काही जुने फोटो दाखवून व्हायरल केले जात असलेले फोटो हे खोटे आहेत, असे सांगिले आहे. तसेच या प्रकरणात खोटे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रारही केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिले आहे.

मी या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार केली

गिरीश महाजन यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी सध्या व्हायरल होत असलेल्या त्यांच्या कथित फोटोंवरही स्पष्टीकरण दिलं. मी या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. हे अशा पद्धतीने जे उद्योग केले जात आहेत, त्या रिकाम्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. मी असेल किंवा कोणीही असेल असे प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाई झालीच पाहिजे. एवढं घाणेरडं दाखवलं जात आहे की ते बघवत नाहीये. सोबतच अशा विषयात नेमकं काय करावं हे समजतही नाहीये, असे गिरीश महाजन म्हणाले.

विवस्त्र फोटो जोडले जात आहेत

तसेच, फोटोंमध्ये बदल करून, फोटोंना छेडछाड करून कोणाचे कोणाशीही फोटो जोडले जात आहेत. विवस्त्र फोटो जोडले जात आहेत. मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मी सायबर विभाग तसेच पोलिसांकडे तक्रार केली आहे. याबाबत मी मुख्यमंत्री मोहोदयांशीही बोललो आहे. त्यांना कारवाई करावी असे पत्र दिले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, आता या प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह