AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : काळजाचा थरकाप! मातीच्या ढिगाऱ्याखाली 9 जण अडकलेलेच? डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती समोर, एकाचा पाय…

Pune moshi news : पुण्याच्या मोशीत कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. घटनेनंतर आतापर्यंत 9 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं आहे.

Pune : काळजाचा थरकाप! मातीच्या ढिगाऱ्याखाली 9 जण अडकलेलेच? डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती समोर, एकाचा पाय...
| Updated on: Jul 09, 2026 | 12:41 PM
Share

पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोशीत बुधवारी कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून भीषण दुर्घटना घडली. डोंगराखाली इमारतीमधील जवळपास 15 जण अडकले होते. आतापर्यंत त्यातील 9 जणांना सुखरूप बाहेर काढायचं आहे. घटनेनंतर सैन्य दल, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, आपात्कालीन पथक मदतकार्य करत आहे. दुसऱ्या दिवसानंतरही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनास्थळाची डोळ्यात आणणारी परिस्थिती मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितली आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोशीतील घटनास्थळी अग्निशमन दल, NDRF आणि लष्कराचे जवान जीवाची बाजी लावून हे अवघड रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत. रेस्क्यू अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक ठरत आहे. अद्यापही ९ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

ढिगाऱ्यातून ९ जणांची सुरक्षित सुटका

पुणे, मावळ येथे इमारत दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ९ जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. अंदाजे ८ ते ९ जण अजूनही अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. लष्कर, एनडीआरएफ (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल आहे.

मोशीतील घटनेवर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, अतिशय दुर्देवी घटना आहे. मागील 30- 35 तासांत 600 मिली रेकाँर्डब्रेक पाऊस झाला आहे. सगळा कचरा वाहून आला होता. एकूण 23 जण या ठिकाणी होते. सहा जणांना बाहेर काढले आहे. युध्दपातळीवर काम सुरु आहे. तीन ते चार जण खालून बोलतायेत. आपण तिथपर्यंत पोहचू शकलो नाही. अडकलेल्या काही जणांना आम्ही लगेच बाहेर काढू शकत नाही. कारण मलबा खूप आहे. त्यांचे पाय अडकले आहेत. अडकलेल्या काहींना चहा-बिस्किट दिलं आहे. ढिगाऱ्यात आणखी जवळपास १२ जण आत असतील. त्यातील तीन जणांशी संपर्क झाला आहे. राज्य शासन, महापालिका, NDRF, अग्निशामन दल, मिलिट्री सगळे घटनास्थळी आहे. सकाळपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन चालेल. थोडा वेळ लागला तरी चालेल. पण एकही जीव नाही गेला पाहीजे, ही आमची भूमिका आहे. आमचा प्रयत्न आहे की, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे’.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे