Girish Mahajan: तर आम्ही एकमेकांना पाडणारच… गिरीश महाजन यांचा मित्र पक्षांना इशारा; संदर्भ काय?

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र अद्याप महायुतीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढवणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मित्रपक्षांना इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Girish Mahajan: तर आम्ही एकमेकांना पाडणारच... गिरीश महाजन यांचा मित्र पक्षांना इशारा; संदर्भ काय?
Girish Mahajan
| Updated on: Oct 12, 2025 | 3:09 PM

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. मात्र अद्याप महायुतीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवणार की स्वतंत्र लढवणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. स्थानिक पातळीवरील समीकरणे लक्षात घेता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मित्रपक्षांना इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील – महाजन

जळगावमध्ये बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थेतील युतीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, ‘वरिष्ठ स्तरावरून आदेश आहेत, आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र ज्या ठिकाणी शक्य नसेल अशा काही अपवादात्मक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. महायुती मिळून एकत्र लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण काही ठिकाणी जमलं नाही तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आम्ही करू.’

आम्ही एकमेकांना पाडणारच आहोत

युती झाली नाही तर भाजपच्या कार्यकर्त्यांना पाडणार असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदानंद शेट्टी यांनी केले आहे. यावर बोलताना महाजन म्हणाले की, ‘युती नाही झाली तर आपण एकमेकांना निवडून आणण्यासाठी थोडंच उभ राहणार आहोत. मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी आम्ही एकमेकांना पाडणारच आहोत. एकमेकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार नाही.’ गिरीश महाजन यांच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वरांज्य संस्थांच्या निवडणूकीत सर्वच पक्षांची राजकीय ताकद पणाला लागणार असल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चावर बोलताना महाजन यांनी, ‘जनावरांसारखा हंबरडा फोडायचा एवढं एकच आता त्यांच्याकडे राहिले आहे असं वाटतं. ज्या दिवसापासून त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या दिवसापासून त्यांच्या नशिबामध्ये हंबरडाच आहे’ असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे सर्वाचा बँड वाजवणार यावर बोलताना महाजन यांनी, आता समोर निवडणूक आहे त्यामुळे समजेल. दोन महिन्यांनी निवडणुका आहे त्यांचे निकाल देखील येतील, त्यात कोणाचा बँड वाजतो आणि कोणाचा ढोल फुटतो हे कळेलच असं विधान केले आहे.