AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्याध्यापक की हैवान… 8 वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार अन्… धक्कादायक घटना समोर

मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनेत दिवसागणिक वाढ होत आहे... आता देखील अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे...ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे... एका आठवीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतील मुख्याध्यापकाने बलात्कार केला आहे...

मुख्याध्यापक की हैवान... 8 वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार अन्... धक्कादायक घटना समोर
| Updated on: Dec 24, 2025 | 12:41 PM
Share

देशाच्या कोणत्या कोपऱ्यात महिला सुरक्षित आहेत असा प्रश्न पुन्हा एक उपस्थित झाला आहे. कारण आठवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला आहे. नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच बलात्कार केला. मुख्यध्यापकाच्या अशा वर्तनामुळे इतर मुलांची सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे… मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्यांमुळे शाळेत देखील मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्याध्यापकाने फक्त विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले नाही तर, तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेमुळे आश्रममध्ये खळबळ माजली आहे…

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर धडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शासकीय आश्रम शाळा तलाईच्या मुख्याध्यापक सह वस्तीगृहाच्या व्यवस्थापिकेवर देखली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस याप्रकरणी आता अधिक चौकशी करत आहेत…

घटना उघड झाल्यानंतर आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण दिसत आहे… घटलेल्या घटनेनंतर आदिवासी आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनासमोर आल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीचं कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी केली आहे… त्यामुळे आता याप्रकरणी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आज कोणत्याच क्षेत्रात मुली मागे नाही… मोठ्या जिद्देने आणि कष्टाने महिला आपलं ध्येय साधताना दिसत आहे… पण दुसरी आणि सर्वात  वाईट बाजू म्हणजे देशाचं नाव मोठ्या करणाऱ्या मुली आणि महिला खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे… तर कोणत्यात क्षेत्रात महिला सुरक्षित नाही… फक्त क्षेत्रच नाही तर, शाळेत देखील मुली सुरक्षित नाही…  त्यामुळे मुलींना शाळेत पाठवायचं की नाही?

शाळेत देखील मुलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत… 3.30 वर्षांच्या मुलीपासून 70 वर्षांच्या वृद्ध महिलेवर देखील बलात्कार होत आहे.  फक्त बलात्कार नाही तर, अनेक मुलींंनी यामध्ये आपले प्राण देखील गमावले आहेत… अशात महिलांच्या सुरक्षेचं काय?  हा सर्वात मोठा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे…

Follow Us
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.