Sonali Phogat | ‘सोनाली फोगट यांचा खून, पीए सुधीर सांगवाननेच रचलं षडयंत्र’ भाऊ रिंकू ढाका यांचा आरोप, गोवा पोलिसांकडे तक्रार

सोनाली फोगाट या मूळच्या हरियाणातल्या असून 2019 मध्ये त्यांनी हिसार मतदार संघातून भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. यावेळी प्रचारादरम्यान त्यांची सुधीर सांगवान यांच्याशी ओळख झाली होती, त्यानंतर त्याने संपत्ती हडपण्यासाठी सोनाली यांचा खून केला असा आरोप फोगाट यांच्या भावाने केला आहे.

Sonali Phogat | 'सोनाली फोगट यांचा खून, पीए सुधीर सांगवाननेच रचलं षडयंत्र' भाऊ रिंकू ढाका यांचा आरोप, गोवा पोलिसांकडे तक्रार
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा खून झाल्याचा आरोप Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 3:12 PM

पणजीः भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर मोठं षडयंत्र रचून झाल्याचा आरोप त्यांचे भाऊ रिंकू ढाका (Rinku Dhaka) यांनी केलाय. गोवा पोलीस स्टेशनमध्ये रिंकू यांनी तक्रार दाखल केली असून या हत्येसाठी दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोनाली फोगाट यांचा पीए सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) हाच त्यांच्या हत्येसाठी दोषी असल्याचा थेट आरोप रिंकू यांनी केलाय. गेल्या काही महिन्यांपासून सोनाली यांना ते ब्लॅकमेल करत होते. त्यांच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करून, अभिनेत्री आणि राजकीय करिअर संपवण्याची धमकी देत होते, त्यानेच सोनालीला जीवे मारण्याचा कट रचलाय, असा आरोप रिंकू ढाका यांनी केलाय. एवढंच नव्हे तर या प्रकरणी गोवा पोलीसदेखील तपासात प्रचंड ढिलाई दाखवत असल्याची तक्रार रिंकू यांनी माध्यमांसमोर केली आहे.

भावाचे आरोप काय?

सोनाली फोगाट यांच्या भावाने पोलिसांकडे केलेल्या लेखी तक्रारीत पुढील आरोप केलेत-

  •  2019 मध्ये सोनाली फोगाट यांनी भाजपकडून आदमपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी प्रचारादरम्यान सुधीर सांगवान याच्याशी ओळख झाली. त्यानंतर तो तिचा पीए म्हणून काम करू लागला. सुधीरसोबत सुखवीर सांगवान यांच्यावर सोनालीचा विश्वास वाढत होता. २०२१ मध्ये सोनाली यांच्या घरी चोरी झाली होती. काही काळानंतर सुधीर सांगवानने सोनालीच्या घरी काम करणारा नोकर आणि कुकलाही हटवलं. तिचं सगळं व्यवस्थापन सुधीर सांगवानच पहात होता.
  •  तीन महिन्यांपूर्वी फोन आला होता. सुधीरने तिला खीर दिली होती. त्यानंतर तिचे हात-पाय थरथरत होते. त्यावर मी सुधीरला विचारले असता त्याने घुमून-फिरून उत्तरं दिली होती. सोनाली तिचे सर्व व्यवहार सुधीरच्या सांगण्यावरूनच करत होती.
  •  22 ऑगस्ट 2022 रोजी सोनालीने आईला फोन केला होता… ती सांगत होती, सुधीरने खाण्यातून काहीतरी दिलंय, ज्यामुळे मला घबराहट होतेय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता सुधीरचाच माझ्या बहिणीलाच सोनालीचा शूटिंगदरम्यान मृत्यू झाल्याचा फोन आला.
  •  मी गोव्यात येऊन चौकशी केली असता इथे कोणतीही शूटिंग सुरु नसल्याचे कळले. सोनालीला चंदिगडमध्येच थांबायचे होते, पण सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीचा खून केला. तिची संपत्ती हडपण्यासाठी तसंच राजकीय षड्यंत्राच्या हेतूने तिचा खून केला. सुधीर सांगवान आणि सुखविंदर आदींविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी, ही विनंती..
Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.