Gokul Kolhapur: गोकुळच्या सत्ताधारी गटाची आज बैठक; सर्वसाधारण सभेची रणनिती आखणार; गोकुळची सभा वादळी ठरण्याची शक्यता

| Updated on: Aug 26, 2022 | 8:05 AM

विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ही आज आखली जाणार रणनीती गोकुळच्या अनेक प्रश्नांवर वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे गोकुळची वार्षिक सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Gokul Kolhapur: गोकुळच्या सत्ताधारी गटाची आज बैठक; सर्वसाधारण सभेची रणनिती आखणार; गोकुळची सभा वादळी ठरण्याची शक्यता
Follow us on

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, मध्यमवर्गीयांच्या अर्थकारणाशी निगडीत असणाऱ्या गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh Kolhapur) 29 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा (General Meeting) होत आहे. कोल्हापुरमधील गोकुळ दूध संघ महाडिक गटाकडून हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी यावर्षी खेचून घेतला होता. ज्यावेळी गोकुळ दूध संघाची निवडणूक लागून पाटील आणि मुश्रीफांनी (Satej Patil-Hasan Mushrif) सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी महाडिक घरण्याकडे कोणतीही सत्ता अथवा पद नव्हते, त्यामुळे त्यावेळी राजकीय पद नसल्याचा फायदा सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांनी घेतला असल्याची टीका करण्यात आली होती, तर आता मात्र धनंजय महाडिक यांना भाजपकडून राज्यसभेचे खासदार पद मिळाले असल्याने गोकुळची पाटील-मुश्रीफ गटाककडे सत्ता आल्यानंतर गोकुळची ही पहिलीच वार्षिक सभा असल्याने वादळी ठरण्याची चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे.

धनंजय महाडिकांकडे आता भाजपचे खासदार पद आणि राज्यातही शिवसेन-भाजपची सत्ता असल्याने गोकुळचे राजकारण अधिकच तापणार असल्याचे दिसत आहे.

सत्ताधारी गटाची पहिलीच सभा

गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा 29 रोजी होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाची बैठक होत असून विरोधकांना तोंड कसे द्यायची आणि याबाबत चर्चा होणार असल्याचे दिसून येत आहे.

विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

जिल्ह्याचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळची प्रत्येक घडामोड ही जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय असतो. आज आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी होणार बैठक होणार असून दुध दरवाढी वरील बोजा, कर्मचारी बदल्या यासह अन्य विषयावरही विरोधक महाडिक गट सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत असल्याने या बैठकीत त्यावर चर्चा होणार असल्याचे दिसून येत आहे.

सभा वादळी ठरणार

विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ही आज आखली जाणार रणनीती गोकुळच्या अनेक प्रश्नांवर वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे गोकुळची वार्षिक सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पाटील-मुश्रीफ गटाकडे आल्यानंतर ही पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेच गोकुळच्या दुधाची दरवाढ, कामगारांचे प्रश्न, वाहतूक व्यवस्था आणि गोकुळच्या दूध उत्पादकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध य़ोजनांबाबत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.