Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!

| Updated on: Jan 20, 2022 | 6:11 AM

गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे मतदारांचा झुकता कल आहे. नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांमध्ये मात्र भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने टक्कर दिली आहे. राष्ट्रवादीच्या किल्ल्यात भाजपने मुसंडी मारली आहे. तसेच नाना पटोले यांनाही गोंदियात मनाजोगे यश मिळालेले नाही.

Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!
गोंदिया जिल्ह्यातील जि. प. निवडणुकीत विजयी जल्लोष करताना उमेदवार
Follow us on

गोंदिया : जिल्हा परिषद निवडणुकीचे परिणाम जाहीर झालेत. गोंदियात भाजपला एकूण 53 जागांपैकी 26 जागांवर विजय मिळविण्यात यश आलंय. भाजप एका अपक्ष उमेदवाराला सोबत घेत सत्ता स्थापन करू शकते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 53 जागा आहेत. भाजपाला या ठिकाणी 26 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला 14 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 8 जागांवर समाधान मानावे लागले. अपक्ष 5 जागांवर निवडूण आलेत. गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस नेते नाना पाटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण, हवा तसा विजय दोन्ही पक्षाला मिळविता आला नाही.

देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत

देवरी नगरपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. देवरी नगरपंचायतीमध्ये भाजपाला 11 जागा तर काँग्रेसला 4 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागांवर समाधान मानावे लागले. नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव मोरगाव अर्जुनी नगरपंचायतीमध्ये भाजपाला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 4 जागा मिळाल्या. तर सेना आणि अपक्ष अशा 2 जागा निवडूण आल्या आहेत. सडक अर्जुनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा तर बाहुबली प्यानलला 3 जागा तर अपक्ष 3 जागांवर निवडूण आले. काँग्रेसला 2 जागांवर, तर सेना आणि भाजपला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावं लागलं.

पंचायत समितीचे संमिश्र निकाल

गोंदिया पंचायत समिती 28 जागांपैकी भाजपला 10, चाबी संघटन 10 जागा, राष्ट्रवादी 5 जागा, अपक्ष 3 जागांवर निवडूण आले. तिरोडा पंचायत समितीत 14 जागांपैकी भाजप 9 जागा, राष्ट्रवादी 3 जागा, काँग्रेस 1 तर अपक्ष 1 जागेवर विजयी ठरले. गोरेगाव पंचायत समितीमध्ये 12 जागांपैकी भाजप 10 जागा, काँग्रेस 2 जागांवर यश मिळवू शकले. देवरी पंचायत समितीमध्ये 10 जागांपैकी भाजप 6 जागा, काँग्रेस 4 जागांवर विजयी ठरले. आमगाव पंचायत समितीमध्ये 10 पैकी
भाजप 5, काँग्रेस 4, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागले. सालेकसा पंचायत समितीमध्ये 8 जागांपैकी काँग्रेस 6, भाजप 2 जागांवर विजयी ठरले. मोरगाव अर्जुनी पंचायत समितीमध्ये 14 जागांपैकी भाजप 6, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, तर अपक्ष 2 जागांवर निवडूण आले. सडक अर्जुनी पंचायत समितीत 10 जागांपैकी भाजप 7, राष्ट्रवादी 2, तर काँग्रेस 1 जागेवर विजयी ठरले.

Chandrapur Election | चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची सरशी; तीन नगरपंचायतीमध्ये बहुमत; पण, व्हाईट हाऊस भाजपचेच

Nagar Panchayat Election result 2022 : ज्या मतदारसंघात पटोलेंनी मोदींना मारण्याची भाषा केली, तिथं काँग्रेस हरली की जिंकली?

Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती