AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती

यवतमाळ जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झालीय. शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला. तर भाजपला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे पारधी समाजाच्या एका बावीस वर्षीय तरुणाने शिवसेनेकडून लढून निवडणूक जिंकली.

Yavatmal Election | पारधी समाजाच्या 22 वर्षीय तरुणाने मारली बाजी; भाजप आमदारांना राखता आल्या नाही नगरपंचायती
यवतमाळ जिल्ह्यात निवडूण आलेले बावीस वर्षीय पारधी समाजाचा तरुण
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 3:21 PM
Share

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. विधानसभेची पाच, तर विधानपरिषदेचा एक आमदार आहे. तरीही आपल्या मतदारसंघातील नगरपंचायती आमदारांना राखता आल्या नाहीत. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसने मात्र चांगली मुसंडी मारली आहे. 102 जागांपैकी 39 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला. सत्ताधारी भाजपला फक्त तेरा जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेना दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे 25 जागा जिंकणारा पक्ष ठरला. 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी उमेदवार 4 जागांवर तर मनसे 3 जागांवर निवडूण आले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी वयाचा 22 वर्षीय तरुण नगरपंचायत निवडणुकीत जिंकून आला. पारधी समाजाच्या या तरुणाला शिवसेनेने संधी दिली होती. विजय चव्हाण कळंब असं या युवकाचं नाव आहे.

अशोक उईके यांना धक्का

राळेगावात काँग्रेसची सत्ता स्थापन होईल, अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे राळेगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कळंब आणि बाभूळगाव राळेगाव या तीन नगरपंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. येथे भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना हा मोठा धक्का मानला जातोय. शिवसेनेने बाळूभगावात सर्वाधिक सहा जागा बळकावल्या. झरी येथे पाच, मारेगावमध्ये चार, महागावामध्ये पाच, कळंब येथे तीन, तर राळेगावमध्ये दोन जागांवर शिवसेनेने मुसंडी मारली आहे. भाजपला बाभूळगाव, कळंब, झरी, राळेगाव येथे धक्का बसला. बाभूळगावात प्रहार एका जागेवर विजयी ठरले. कळंबमध्ये वंचितने एक जागा पटकाविली. मनसेला तीन जागा मिळाल्या.

काँग्रेसची आगेकूच, सेनेची सरशी

राळेगावमध्ये 11 जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले तर कळंबमध्ये केवळ 2 जागी भाजपचे उमेदवार विजय झाले. तर बाभूळगावमध्ये 2 जागांवर भाजप उमेदवार आल्याने तेवढ्यात समाधान मानावे लागले. तर झरी नगरपंचायतीमध्ये 17 जागांपैकी केवळ 1 जागा भाजपला मिळाली. त्यामुळं हा विद्यमान भाजप आमदार संजीव रेड्डी बोडकुरवार यांना मोठा धक्का मानला जातोय. या शिवाय मारेगावमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. महागावमध्येही काँग्रेसचे 7 जागांवर तर शिवसेना 5 आणि भाजप 4 जागी उमेदवार विजयी झाले आहेत. झरीमध्ये काँग्रेस 5, शिवसेना 5. जंगोम दल 4, भाजप 1, मनसे 1 जागी उमेदवार जिंकून आले आहेत. एकूणच जिल्ह्यातील काँग्रेसची आगेकूच तर भाजपची जिल्ह्यात पिछेहाट पहायला मिळाली आहे.

खाते उघडल्याने राष्ट्रवादी समाधानी

राष्ट्रवादीने राळेगाव येथे 1 जागा बळकावली. तर बाभूळगावमध्ये 2, मारेगावमध्ये 1 जागा जिंकली. जिथं राष्ट्रवादी नव्हती तिथं खात उघडल्यानं राष्ट्रवादीने समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या शिवाय नगरपंचायत निवडणूक इतर कोणतीही नेत्याने फारशी मनावर घेतली नव्हती. त्यामुळं आलेले यश हे समाधानी आहे, असे राष्ट्रवादीच्या गोट्यातून ऐकायला मिळते.

VIDEO: Nagar Panchayat Election Result 2022 | नगरपंचायत निवडणुकीवर Nawab Malik यांची प्रतिक्रिया

VIDEO : R. R Patil यांचे सुपुत्र Rohit Patil यांच्या विजयाचं Uday Samant यांच्याकडून कौतुक

VIDEO : Beed Election Result 2022 |बीडच्या निवडणुकीतील विजयाचं श्रेय Pankaja Munde यांना आहे-Suresh Dhas

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.