Gondia : यादीत नाव येऊनही कर्ज माफी न झाल्याने गोंदियातील शेतकरी चढला मोबाईल टॉवरवर

| Updated on: Apr 14, 2022 | 10:53 PM

वासुदेव यांनी गोंदियाच्या जिल्हा को-ओपरेटिव्ह बँकेतून 2009 साली कर्ज घेतले असून सर्व शेतकऱ्ंयाची कर्ज माफी झाली मात्र माझी कर्ज माफी झाली नसून बँकेतील अधिकऱ्यांनी माझ्या खात्यावर खोट्या पद्धतीने कर्ज उचलून मला कर्ज बाजारी दाखवत असल्याचा आरोपी वासुदेव तावडे यांनी बँकेवर केला आहे.

Gondia : यादीत नाव येऊनही कर्ज माफी न झाल्याने गोंदियातील शेतकरी चढला मोबाईल टॉवरवर
कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
Image Credit source: TV9
Follow us on

गोंदिया : गोंदियाच्या खातीया गावात कर्ज माफीच्या यादीतही नाव येऊन कर्ज माफी न झाल्याने तसेच मुलाच्या अपघाताची माहिती पोलिस देत नसल्याने खातिया गावातील एक शेतकरी (Farmer) मोबाईल टॉवर (Mobile Tower)वर चढले आहेत. वासुदेव तावडे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते आज सकाळी 4 वाजल्यापासून गावात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढले आहेत. जवळपास 12 तासाचा कालावधी लोटला असली तरी वासुदेव टॉवरवरून उतरायला तयार झाले नसून स्वतः जिल्हाधिकऱ्यांनी लेखी दिल्यानंतरच टॉवर खाली उतरणार असा तगादा लावून बसले आहेत. (Sholay style agitation of farmers in Gondia climbing on mobile towers for debt waiver)

बँकवाले खोट्या पद्धतीने कर्ज बाजारी दाखवल्याचा आरोप

वासुदेव यांनी गोंदियाच्या जिल्हा को-ओपरेटिव्ह बँकेतून 2009 साली कर्ज घेतले असून सर्व शेतकऱ्ंयाची कर्ज माफी झाली मात्र माझी कर्ज माफी झाली नसून बँकेतील अधिकऱ्यांनी माझ्या खात्यावर खोट्या पद्धतीने कर्ज उचलून मला कर्ज बाजारी दाखवत असल्याचा आरोपी वासुदेव तावडे यांनी बँकेवर केला आहे. तर वासुदेव यांचा मुलगा गोपाळ याचा 1 जानेवारी 2021 च्या सकाळी आमगावला जात असताना त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप वासुदेव यांनी आमगाव पोलिसांकडे केला होता. पोलिस अपघाताची माहिती देत नसून दोषी ट्रक चालकाला सोडून दिल्याने संतापलेल्या वासुदेव तावडे यांनी आज सकाळी गावात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलनाला सुरवात केली.

स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन लेखी अश्वासन द्यावे तेव्हाच खाली उतरेन अशी भूमिका घेतली असून सकाळपासून जिल्हा प्रशासन वासुदेव यांना खाली उतरविण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र वासुदेव हे खाली उतरायला तयार नाहीत तर या संदर्भात बँकेचे सचिव यांना विचारणा केली असता बँकेने वासुदेव यांचे काही कर्ज माफ केले असून काही कर्ज बाकी असल्याचे म्हणणे आहे. (Sholay style agitation of farmers in Gondia climbing on mobile towers for debt waiver)

इतर बातम्या

Video : उल्हासनगरमध्ये मोबाईल चोरीसाठी हत्या करणाऱ्या दोघांना बेड्या, तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई

Kalyan Crime : कल्याणमधील सराईत गुन्हेगार पापा हड्डीच्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या