गूगलच्या होम पेजवर 'बाबा'

मुंबई : इंटरनेट जगतातील जायंट मानल्या जाणाऱ्या गूगलने आज आपल्या डूडलद्वारे दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांना आदरांजली वाहिली आहे. पद्मश्री, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, गांधी पिस प्राईज इत्यादी देश-विदेशातील पुरस्कारांनी आतापर्यंत बाबांचे काम गौरवले गेले. आता गूगलनेही डूडलद्वारे बाबांना आदरांजली वाहत सलाम केले आहे. तसेच, होमपेजवर गूगलने डूडलमध्ये काही आणखी चित्रही समाविष्ट केले असून, त्यात बाबांचा …

Baba Amte, गूगलच्या होम पेजवर ‘बाबा’

मुंबई : इंटरनेट जगतातील जायंट मानल्या जाणाऱ्या गूगलने आज आपल्या डूडलद्वारे दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांना आदरांजली वाहिली आहे. पद्मश्री, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे, गांधी पिस प्राईज इत्यादी देश-विदेशातील पुरस्कारांनी आतापर्यंत बाबांचे काम गौरवले गेले. आता गूगलनेही डूडलद्वारे बाबांना आदरांजली वाहत सलाम केले आहे.

Baba Amte, गूगलच्या होम पेजवर ‘बाबा’

तसेच, होमपेजवर गूगलने डूडलमध्ये काही आणखी चित्रही समाविष्ट केले असून, त्यात बाबांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, आदिवासींसाठीचं काम, आरोग्यसेवेतील योगदान, सामाजिक चळवळींमधील सक्रीयता इत्यादी गोष्टीही दाखवल्या आहेत.

Baba Amte, गूगलच्या होम पेजवर ‘बाबा’

मुरलीधर देवीदास आमटे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेले बाबा आमटे जाऊन दशक लोटलं. आज बाबांची जयंती आहे. 26 डिसेंबर 1914 रोजी बाबांचा हिंगणघाट येथे जन्म झाला. भारत तेव्हा पारतंत्र्यात होता. गांधी विचारांच्या बाबांनी आपलं अवघं आयुष्य शांतता प्रस्थापित करण्यासाठी, दिन-दुबळ्यांना मदतीचा हात देण्यासाठी, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आणि एकंदरीतच मानवजातीच्या उद्धारासाठी अर्पण केलं.

Baba Amte, गूगलच्या होम पेजवर ‘बाबा’

डॉ. साधना आमटे म्हणजे बाबांच्या पत्नी. या आमटे दाम्पत्याने महाराष्ट्राच्या अत्यंत दुर्गम अशा भागात जाऊन आदिवासी, तसेच ज्यांच्यापर्यंत कधीच आरोग्य सेवा किंवा कुठलीच सेवा पोहोचली नाही, कुष्ठरोग्यांना वाळीत टाकल्याप्रमाणे बाजूला ठेवले जाई, अशांसाठी बाबा देवदूत बनून राहिले. एखादी अख्यायिका वाटावी अशाप्रकारे बाबांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतला आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते व्रत जपले.

Baba Amte, गूगलच्या होम पेजवर ‘बाबा’

गांधी विचारांच्या बाबांनी 1950 साली ‘आनंदवन’ची स्थापना केली आणि दिन-दुबळ्यांच्या जगण्यात ‘आनंद’ भरण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. बाबांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे दोन्ही मुलं प्रकाश आमटे आणि विकास आमटे हे मोठ्या जबाबदारीने पुढे नेत आहेत. विशेष म्हणजे, प्रकाश आमटे यांचाही आज वाढदिवस आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीमकडून दिवंगत बाबा आमटे यांना आदरांजली आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *