रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागनीने डागलं पाहिजे, त्यांनी…, गोपीचंद पडळकर संतापले

एमपीएसची आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा यासाठी रोहित पवार यांच्या नेतृत्वात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं, यावरून आता गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागनीने डागलं पाहिजे, त्यांनी..., गोपीचंद पडळकर संतापले
Gopichand Padalkar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 7:43 PM

एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये गोंधळ सुरूच आहे.  यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. एमपीएसचीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. त्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन देखील उभारलं. आता या आंदोलनावरून गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांचे डोके मेंढराच्या डागनीने डागले पाहिजे, त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तमाशा केला असं पडळकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान पडळकर यांच्या या विधानामुळे आता वातावरण तापण्याची शक्यात आहे.

नेमकं काय म्हणाले पडळकर? 

Loading...

रोहित पवार यांचे डोके मेंढराच्या डागनीने डागलं पाहिजे. कारण सीपी महोदय यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी हेच रोहित पवार अध्यक्षाच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही असे म्हटले होते. परत तुम्ही हा विषय कसा काय काढता? आंदोलनं आम्ही पण केले आहेत. परंतु त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तमाशाचा फड करून टाकला आहे, असं यावेळी पडळकर यांनी म्हटलं आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडला तर पूर्ण राजकारण विरहित हे आंदोलन सुरू आहे. आज काय घटना घडली ते माहित नाही. पण विद्यार्थ्यांची माथी भडकवणं रोहित पवार यांनी थांबवलं पाहिजे, असंही यावेळी पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊतांनी,आधी आपण राज्यसभेवर निवडून येतो का? याची चिंता करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला त्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही,अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय राऊतांवर केली आहे. केंद्रातील सरकार कोसळणार, या संजय राऊतंकडून करण्यात आलेल्या विधानावरून पडळकर यांनी संजय राऊतांवर नाशाणा साधला आहे, गेल्या 6 वर्षांपासून राऊत सरकार कोसळणार,असं म्हणत आहेत, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us