OBC जातीय जनगणनेसाठी पडळकर म्हणतात मोदींना पत्र लिहिणार !

| Updated on: Jan 30, 2021 | 6:47 PM

ओबीसींच्या जातीनुसार जणगणनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु," अशीही माहिती पडळकरांनी दिली.  (Gopichand Padalkar OBC census)

OBC जातीय जनगणनेसाठी पडळकर म्हणतात मोदींना पत्र लिहिणार !
Follow us on

नागपूर :ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना व्हावी,” अशी मागणी भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ओबीसी समाजाच्या जातीनुसार जणगणनेसाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार असल्याचेही पडळकरांनी सांगितले. (Gopichand Padalkar will write Letter for OBC census)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या जातीनुसार जनगणना व्हावी यासाठी गोपीचंद पडळकरांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. “ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना व्हावी, यासाठी उद्या पंतप्रधान मोदींना पत्र देऊ,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले. “ओबीसींच्या जातीनुसार जणगणनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु,” अशीही माहिती पडळकरांनी दिली.

जालन्यात महामोर्चा

दरम्यान ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते.

पंकजा मुंडे आक्रमक 

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली होती.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीसोबत पंकजा मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’, अशी कॅप्शन दिली होती. त्यामुळे आगामी काळात ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले होते.  (Gopichand Padalkar will write Letter to PM Modi for OBC census)

संबंधित बातम्या : 

आम्हीही याच देशाचे, आमचीही गणती करा, पंकजा मुंडेंची मागणी, गोपीनाथरावांचा व्हिडीओ ट्विट

ओबीसी जनगणनेबाबात एकमत, महाराष्ट्र विधानसभेत कोण काय म्हणाले?