AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत..

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी खास योजना सुरू केली. या लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहिन्याला सरकारकडून 1500 रूपये मानधन दिले जाते. मात्र, या योजनेसाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले होते. आता काही लाडक्या बहिणींकडून महिलांना मोठा दणका देण्यात आला.

लाडक्या बहिणींना मोठा दणका! होणार थेट करवाई, अपात्र बहिणींचे पैसे घेणार परत..
Ladki Bahin Yojana
| Updated on: Apr 26, 2026 | 9:57 AM
Share

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहिन्याला 1500 रूपये दिली जातात. या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला. महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान करत पुन्हा सत्तेत आणले. मध्यंतरी चर्चा होती की, लाडकी बहीण योजना बंद होईल. मात्र, त्यानंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी सरकारने लागू केल्या होत्या. मात्र, अपात्र असलेल्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला. सरकारने केवायसी करण्याचे आदेश काढले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आला. अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली नुकताच करण्यात आली.

या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली करण्याचे काम सरकारकडून सुरू करण्यात आले. राज्यातील 12915 लाभार्थी हे अपात्र आढळून आले आहेत. त्यापैकी 6457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. सरकारकडून हा मोठा धक्का देण्यात आल्याचे कळत आहे.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, अपात्र महिलांपैकी 2652 महिला या सरकारी कर्मचारी आहेत. या महिलांनी सरकारचे 3 कोटी 58 लाख रुपये लाटले आहेत. सरकार कर्मचारी असलेल्या महिलांनी 18 ते 21 हजार रुपये घेतले लाटली. त्यापैकी निम्मी वसुली करण्यात आली आहे. बाकी वसुली करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.

महिला व बालकल्याण सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी ग्रामविकास विभागाकडून अहवाल मागवला. त्यानुसार, ही कारवाई केली जात आहे. लाडकी बहीण योजनेत महत्वाची अट होती की, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारी कर्मचारी महिला अर्ज करू शकत नाही. मात्र, अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला. आता हळू हळू याबाबतची माहिती पुढे येत आहे. थेटपणे या लाडक्या बहिणींकडून सरकारकडून वसुली केली जात आहे.

Follow Us
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!