
Govind Barge Case : महाराष्ट्रात सध्या गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. एका नर्तिकेच्या नादाला लागून गोविंद बर्गे यांनी स्वतःचं आयुष्य गोळी झाडून संपवलं आहे. याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गायकवाड सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. पण याप्रकरणी रोज नवीन धक्कादायक अपडेट समोर येत आहेत. दरम्यान पूजा गायकवाड हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. पूजा हिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली होती. ती रील पूजा तुरुंगात गेल्यानंतर चर्चेत आली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली रील पूजा हिने ‘S’ नावाच्या एक व्यक्तीसाठी केल्याचं दिसून येत आहे. पूजाने स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘बस्स तू ही मेरा है ‘S” असं लिहिलं आहे. त्यामुळे चौकशी सुरु असताना पूजा हिच्या आयुष्यातील ‘S’ कोण आहे. याची चर्चा देखील सुरु झाली आहे. पूजा हिच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत संताप देखील व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र पूजा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सुरु आहे.
एवढंच नाही तर, अनेक व्हिडीओंमध्ये पूजा हिने गळ्यात मंगळसूत्र देखील घातलं आहे. ज्यामुळे पूजा हिच्या गळातील मंगळसूत्र कोणाच्या नावाचं आहे… असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बर्गे कुटुंबियांकडून नर्तकी पूजावर विविध आरोप करण्यात आले होते.
पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वैराग इथं एका कला केंद्रात काम करते. याच कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांची पहिली ओळख झाली आणि भेटी वाढच गेल्या. अखेर ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. पण या प्रेमामुळे आपला घात होईल… याचा विचार देखील कधी गोविंद यांनी केला नसेल. रिपोर्टनुसार, गोविंद बर्गे यांनी पूजा हिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याची माहिती देखील समोर येत आहे.
फोन, सोन, जमिन, प्लॉट सर्वकाही गोविंद यांनी पूजा हिलं दिलं. एवढंच नाही तर, घराची मागणी केल्यानंतर ‘तुला नवीन घर बांधून देतो..’ असं देखील गोविंद म्हणाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळे पूजा हिने गोविंद यांच्यासोबत बोलणं देखील बंद केलं होतं. एवढंच नाही तर, पूजा हिने गोविंद यांना धमकी देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. ‘गोराईयेथील बंगला माझ्या नावावर कर आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेतीची कर… नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल…’ अशा धमक्यांमुळे गोविंद नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.
अखेर गोविंद यांचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये आढळला. पूजा हिच्या घरापासून काही अंतरावर गोविंद यांनी गाडीच्या काचा लावून स्वतःवर गोळी झाडली. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.