दिशा पटानीची बहीण असं काय म्हणाली की ज्यामुळे झाला गोळीबार, त्या वाक्याने…
Disha Patani House Firing: दिशा पटानी हिच्या बहिणीचं असं वक्तव्य कुटुंबियांना पडलं महागात, गुंड आले, घरावर गोळीबार केला आणि म्हणाले..., कुटुंबियांमध्ये भीती वातावरण...

Disha Patani House Firing: अभिनेत्री दिशा पटानी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. कायम ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असणारी दिशा आता घरावर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आली आहे. बरेली येथील घरावर गोळीबार झाल्यामुळे अभिनेत्रीच्या कुटुंबियांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. तर दिशा पटानी हिच्या आई – वडिलांच्या घरावर गोळीबार कोणी आणि का केला असेल? अशा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर दिशा पटानी हिची बहिणी आणि माजी लष्कर अधिकार खुशबू पटानी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे घरावर गोळीबार करण्यात आला आहे.
सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्ली सोशल मीडियावर आध्यात्मिक नेते आणि धार्मिक वक्ते अनिरुद्धाचार्य महाराज यांनी मुलींबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. लिव्हइन रिलेशनशिपबद्दल देखील अनिरुद्धाचार्य महाराज यांनी वक्तव्य केलं होतं. ज्यावर खुशबू यांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत खुशबू यांनी अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर टीका केली होती.
अनिरुद्धाचार्य महाराज म्हणालेले, ‘मुलं 25 वर्षांच्या मुलींना घेऊन येतात, ज्यांना आधी 4 – 5 ठिकाणी तोंड मारलेलं असतं.’ यावर खुशबू यांनी संताप व्यक्त केला आणि म्हणाल्या, ‘बाबा माझ्या समोर असते तर, मी सांगितलं असतं तोंड मारणं काय असतं ते… बाबा राष्ट्र विरोधी आहे… तुम्ही अशा बदमाशांना पाठिंबा देऊ नये. या समाजातील सर्व नपुंसक लोक त्याचं अनुसरण करतात.’
खुशबू पटानी पुढे म्हणाल्या, ‘समाजातील नपुसंक लोक त्याला (अनिरुद्धाचार्य महाराज) फॉलो करतात. मुली लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात, तोंड मारतात… त्यांना का नाही बोलत जी मुलं लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात? मुली एकट्या लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहतात का? आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं काही पाप आहे का?’ या वक्तव्यानमुळे खुशबू पटानी आणि त्यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.
कोणी स्वीकारली गोळीबाराची जबाबदारी?
समोर येत असलेल्या माहितीनुसार घटनेची जबाबदारी रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने स्वीकारली आहे… सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘खुशबू हिने पूज्य संतांचा अपमान केला आहे. तिने सनातन धर्माचा अपमान केला आहे… आमच्या देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही.’ गोळीबारानंतर दिशा पटानी हिच्या घराबाहेर पालीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
