photo story: रस्त्याची कामे नीट करा, खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात; एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर भडकले

ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांना सहा सहा तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (Guardian Minister Eknath Shinde inspect pothole in thane)

photo story: रस्त्याची कामे नीट करा, खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात; एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर भडकले
thane pothole
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 5:05 PM

ठाणे: ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. खड्ड्यांमुळे प्रवाशांना सहा सहा तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत अडकून पडावेल लागले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रस्त्याची कामे नीट करा. नाही तर कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा. खड्ड्यांमुळे आम्हाला शिव्या खाव्या लागतात, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. (Guardian Minister Eknath Shinde inspect pothole in thane)

thane pothole

thane pothole

एकनाथ शिंदे यांनी तीन हात नाका सिग्नलसह शहरातील विविध रस्त्यांची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे आणि ग्रामीण पोलीसही त्यांच्यासोबत होते. यावेळी शिंदे यांनी रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या दर्जाचीही पाहणी केली.

thane pothole

thane pothole

यावेळी रस्त्यांची चाळण झालेली पाहून शिंदे यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जे काम केले आहे ते चांगले काम करा. पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची कामे करण्यास सांगितले होते ती कामे पूर्ण करा. रस्त्यावरील खड्ड्यांच्या रोज बातम्या येत आहेत. लोक वैतागत आहेत. त्यामुळे आम्हाला शिव्या खाव्या लागत आहेत. कंत्राटदार रस्त्यांचे काम नीट करत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्ट करा, अशा सूचना देतानाच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी देखील या कामात लक्ष घातलं पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

शहरातील पाच उड्डाणपुलावरील रस्ते नीट आहेत. मात्र, काही रस्त्यांची डागडुजी होणे बाकी आहे. मात्र, रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करू नका. अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर करवाई करा, असं सांगतानाच शहरातील परिस्थिती लक्षात घेऊनच फाऊंटन आणि जेएनपीटीकडील वाहने सोडावी लागणार आहे, असं ते म्हणाले.

thane pothole

thane pothole

शहरातील रस्त्यांची कामे आम्ही युद्धपातळीवर हाती घेतली आहे. खड्डे लवकरात लवकर बुजवले जाणार आहेत. पाऊस ओसरला की रस्त्याची कामे जोमाने सुरू करणार आहोत. निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत. वाहतूक कोंडीमागे केवळ खड्डे हे एकमेव कारण नाही. तर मोठी अवजड वाहने, जेएनपीटीतील अवजड वाहने आदींमुळेही वाहतूक कोंडी होत आहे, असं त्यांनी सांगितलं. (Guardian Minister Eknath Shinde inspect pothole in thane)

संबंधित बातम्या:

16 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन पोलिसांना महिनाभर चकवा, हनी ट्रॅपच्या माध्यमातून नराधमाला बेड्या

‘त्या’ नराधमांना फाशी देऊ नका, त्यांचा लिंगच्छेद करून गावागावातून मिरवणूक काढा; रिपाइं महिला कार्यकर्त्या संतापल्या

अरे बापरे! ठाण्यात सूजर वॉटर पार्कमध्ये आढळली 7 फूट लांब मगर; कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली

(Guardian Minister Eknath Shinde inspect pothole in thane)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.