‘त्या’ नराधमांना फाशी देऊ नका, त्यांचा लिंगच्छेद करून गावागावातून मिरवणूक काढा; रिपाइं महिला कार्यकर्त्या संतापल्या

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. या घटनेवर रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. (republican party demands action against gang rape accused)

'त्या' नराधमांना फाशी देऊ नका, त्यांचा लिंगच्छेद करून गावागावातून मिरवणूक काढा; रिपाइं महिला कार्यकर्त्या संतापल्या
minor girl
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 2:51 PM

डोंबिवली: डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. या घटनेवर रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या महिला कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांचा लिंगच्छेद करा, अशी संतप्त मागणी या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. (republican party demands action against gang rape accused)

एका अल्पवयीन तरुणीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत समोर आली होती. देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर आज रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी आरोपींना फाशी देऊ नका, तर त्यांचा लिंगच्छेद करून त्यांची गावागावात मिरवणूक काढा, अशी संतप्त मागणी रिपाइंच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी आरोपींना दयामाया न दाखवता पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करत या घटनेचा निषेधही नोंदवला.

विद्यार्थी भारतीचं आंदोलन

दरम्यान, विद्यार्थी भारती या संघटनेनेही या घटनेचा निषेध नोंदवला आहे. विद्यार्थी भारती संघटनेने आज पोलिसांना निवेदन दिलं असून महिलांच्या सुरक्षेसाठी कल्याण आणि डोंबिवलीत ग्रामपंचायत लेव्हलवर सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. विद्यार्थी भारतीने आज सकाळी 11.30 वाजता कल्याण पश्चिमेला तहसीलदार कार्यालयासमोरही निषेध आंदोलन केलं. तसेच कल्याण, डोंबिवलीत ठिकठिकामी कौन्सिलिंग सेंटर उभे करण्याची मागणीही केली. बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे, असं आवाहन विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले.

आणखी दोघे जेरबंद

दरम्यान, या घटनेप्रकरणी कालपर्यंत 26 जणांना पोलिसांनी अटक केली होती. आज आणखी दोघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 28 वर गेली आहे. यामधील आरोपी नवी मुंबई, डोंबिवली येथे राहणारे असल्याची माहिती एसपी सोनाली ढोले यांनी दिली. प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अनेक जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

घटना ऐकून पोलीसही हैराण

या घटनेमुळे डोंबिवली ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीने मानपाडा पोलीस ठाण्यात आपल्यावर 8 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार सुरु असल्याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेत चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये जी माहिती समोर आली ते ऐकून पोलीस हैराण झाले. (republican party demands action against gang rape accused)

संबंधित बातम्या:

अवघ्या 15 वर्षाच्या मुलीवर 29 जणांकडून सामूहिक बलात्कार, पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार

डोंबिवलीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

बॉयफ्रेण्डकडून बलात्काराचं व्हिडीओ शूट, 14 वर्षीय मुलीवर 31 जणांचा गँगरेप, डोंबिवलीत खळबळ

(republican party demands action against gang rape accused)

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.