AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज, डोंबिवलीपासून धुळ्यापर्यंत जय्यत तयारी!

महाराष्ट्र हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. गुढी पाडव्याला राज्यभर चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डोंबिवलीतील भव्य शोभायात्रा, पुण्याच्या बाजारपेठेतील गाठी आणि बांबूची वाढती मागणी आणि धुळ्यातील गतिमंद मुलींनी बनवलेल्या आकर्षक गुढ्या हे या उत्सवाचे खास आकर्षण आहे. प्रत्येकजण या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यात सक्रियपणे सहभागी होत आहे.

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज, डोंबिवलीपासून धुळ्यापर्यंत जय्यत तयारी!
गुढी पाडवाImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 18, 2026 | 1:38 PM
Share

राज्यात हिंदू नवीन वर्ष उद्यापासून सुरू होत आहे. गुढी पाडव्याचा दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक हिंदू माणूस घरासमोर गुढ्या उभारत असतो. गुढी पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढल्या जातात. तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या शिवाय घरात पुरणपोळीचा बेतही केला जातो. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. शेवटची तयारीही जय्यत सुरू झाली आहे.

चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजेच गुढी पाडव्याला संपूर्ण गावाने हिंदू नववर्षाचे जोरदार स्वागत करायला हवे या विचारांतून डोंबिवलीतून सुरु झालेल्या गुढी पाडवा नववर्ष शोभायात्रेला जगभरातील मराठी आणि हिंदू समुदायाने आपलेसे केले आहे. डोंबिवलीतील शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून केले जाणारे अनोखे उपक्रम. यंदा डोंबिवलीकर परिवारातर्फे वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अतिशय आशयघन चित्ररथ लक्षवेधी ठरणार आहेत. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि रास्व संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी अशा डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराचे प्रवर्तक भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. या वर्षीचे अजून एक खास आकर्षण ठरणार आहे दीडशे फुटांची गुढी. विशाल हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभी राहील, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.

अनोखी स्पर्धा, घसघशीत बक्षिस

तसेच यंदाच्या वर्षी देशभक्तीची अनेक रूपं अशा आशयाची संकल्पना राबविण्याचे ठरवले असून “क्रांतिकारी देशसेवक” वेशभूषा स्पर्धा होणार आहे. 5 वर्षांवरील व्यक्तींसाठी ही वेशभूषा स्पर्धा खुली असून स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि एकूणच भारत देशासाठी त्याग करणाऱ्या व्यक्तीची हुबेहूब वेशभूषा करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. विजेत्यास 25,000 रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असून उपविजेत्यास 15,000 त्याचबरोबर अन्य पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

पुण्यात जय्यत तयारी

गुढीपाडवा सणाच्या पाश्वभूमीवर कलात्मक, सुबक, रंगीबेरंगी गाठ्यांनी पुण्याच्या भोरमधील बाजारपेठेतील दुकानं सजली आहेत. गुढीला नैवद्य म्हणून लागणाऱ्या रंगीबेरंगी साखरेच्या गाठ्या खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. युद्ध परिस्थितीमुळं उत्पादन खर्च वाढला असल्याने यंदा गाठीच्या बाजारभावात चाळीस टक्क्यांची दरवाढ झाली आहे. पारंपरिक पध्दतीने बनविलेल्या 20 ग्रॅमपासून एक किलो पर्यंतच्या गाठी विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत.

बांबूची मागणी वाढली

गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत बाबुंची मागणी वाढली आहे. साडेतीन मूर्त्यांपैकी एक असणारा गुढीपाडवा सण उद्यावर येऊन ठेपल्याने, पुण्याच्या भोरमध्ये पाडव्याल्या गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूची मोठी आवक झाली आहे. नागरिकही बांबू खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. बांबूंच्या उंचीनुसार 60 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत बांबूची विक्री होत आहे. 6 फुटांपासून ते 25 फुटांपर्यंत उंचीचे बांबू बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. भोर तालुक्यातील हिरडस मावळ भागातून पाडवा सणाच्या 15 दिवसआधी डोंगर दऱ्यातून बांबूची तोड करून भोर शहरासह विविध जिल्ह्यात हे बांबू विक्रीसाठी पाठवले जातात. बांबुच्या विक्रीतून गेल्या चार पाच दिवसात मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. मागणी वाढून दर चांगला मिळत असल्यानं बांबू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान पहायला मिळत आहे.

अनाथ गतिमंद मुलींनी बनवल्या 500 गुढ्या

गतिमंद असल्यामुळे आपल्या कुटुंबाने रस्त्यावर सोडून दिलेल्या अनाथ अशा गतिमंद मुलींकडून गुढीपाडव्यानिमित्त गुढ्या बनवण्यात आल्या आहेत. धुळे शहरात असलेल्या यमुनाबाई शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाची संस्कार बालगृह ही अनाथ गतिमंद मुलींची शाळा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून बेवारस अशा 99 गतिमंद मुलींचा सांभाळा केला जातो. आधीच कुटुंबाकडून गतिमंद असल्याने सोडून दिलेल्या या मुली या संस्थेकडून आपल्या कुटुंबियाप्रमाणे सांभाळल्या जातात. त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी या मुलींच्या छंदाप्रमाणे त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात गोडी लागावी म्हणून संस्थेकडून त्यांची विविध वस्तू बनवण्याची कार्यशाळा घेतली जाते. शिक्षकांच्या मदतीने या मुली विविध सणावारांना वेगवेगळ्या वस्तू बनवतात.

गुढीपाडव्यानिमित्त या गतिमंद मुलींकडून अत्यंत आकर्षक अशा भेट वस्तू देण्यासाठी बनल्या जातात. गुढीपाडव्याला लहान गुढ्या बनवल्या जातात. आतापर्यंत त्यांनी 500 गुढ्या बनवल्या आहेत. तर दिवाळीत आकाश कंदिलांचीही निर्मिती केली जाते. सध्या गुढीपाडव्यानिमित्त या मुली गुढ्या बनवण्यात व्यस्त आहेत. अत्यंत कलाकुसरीने या मुली गतिमंद असताना देखील सुंदर अशा गुढ्या बनवण्यात मग्न आहेत. या गुढ्या बनवून त्या विविध संस्थांना विकण्यात येतात.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी