AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज, उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत; गुणरत्न सदावर्तेंचा खोचक टोला, म्हणाले दोघेही करमणुकीचं साधण…

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचे संकेत मिळत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज, उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत; गुणरत्न सदावर्तेंचा खोचक टोला, म्हणाले दोघेही करमणुकीचं साधण...
Gunaratna Sadavarte Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2025 | 9:51 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले आहेत. यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे ही बातमी तयार करण्यात आली आहे,  अभिनेते महेश मांजरेकरांकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवला आहे, एक बात कहूंगा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कन्फ्यूज, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

सदावर्ते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे ही बातमी तयार करण्यात आली आहे,  अभिनेते महेश मांजरेकरांकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवला आहे, एक बात कहूंगा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कन्फ्यूज. राजकारणात काय कौटुंबीक असते का? उध्दव ठाकरेंचं राजकारण भाईजानचं राजकारण आहे. राज ठाकरे गले मीलो म्हणत असतील तर, हे दोघेही करमणुकीचं साधण झाले आहेत, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे विधानसभेत एकही माणूस नाही, उद्धव ठाकरेंकडे किती लोक राहातील सांगता येत नाही. दोघांचे पक्ष हे गल्लीतील आहेत, गल्लीतून घरापर्यंत हे जातील. लोकांना टोल, ब्रिज सगळं समजलं आहे. हिंदी भाषेच्या फेल्युलर नंतर यांनी गले मीलो गले मीलो सुरू केलं आहे. राज ठाकरे यांचे लोकच याला अभद्र युती म्हणत आहेत. हिंदीचा विरोध फेल जाणार म्हणून महेश मांजरेकर यांच्या मार्फत नवीन प्रोडक्शन सुरू झालं आहे. दोघांचही काही राहीलं नाही, कागदावरची आयडीयॉलॉजी नाही, यांना राजकीय सल्ल्याची गरज आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

युतीचे संकेत

महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापुढे भांडणं, वाद या क्षुल्लक गोष्टी असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?