AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार हार पचवू शकले नाहीत म्हणून मला, पतीला फसवण्यात आलं : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा सरकारवर आरोप

तर सध्याचे सरकार हे नापास सरकार आहे. हे सरकार संविधानिक वागत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच असे नाही केले तर मोगलाईसारखे अत्यार राज्यात होत राहतील, असंही अॅड. जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकार हार पचवू शकले नाहीत म्हणून मला, पतीला फसवण्यात आलं : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा सरकारवर आरोप
अॅड. जयश्री पाटीलImage Credit source: tv9
| Updated on: Apr 30, 2022 | 5:15 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाबाहेर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या कटात सहभाग असल्याचा आणि आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप अ‍ॅड. जयश्री पाटील यांचे पती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झाला. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणेसह आणखीन ३ जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सदावर्ते यांना त्या त्या जिल्ह्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनंतर त्यांची जामिनावर सुटका केली. तर अ‍ॅड. जयश्री पाटील यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) सोमवारी दिलासा देत २९ एप्रिलपर्यंत अटकेपासून हंगामी संरक्षण दिले होते. यादरम्यान जयश्री पाटील सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना सरकार हार पचवू शकले नाहीत म्हणून मला, पतीला फसवण्यात आलं असे म्हटलं आहे. तसेच जयश्री पाटील सदावर्ते (Adv. Jayashree Patil) यांनी सत्यमेव जयते असे म्हटलं आहे.

मला, पतीला फसवण्यात आलं

अख्या महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संपानंतर काय झाले हे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानंतर १८ दिवसांनंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते जामिननावर बाहेर येताच त्यांनी राज्य सरकारवर हल्ला केला होता. त्यानंतर आता अ‍ॅड. जयश्री पाटील सदावर्ते यांनी देखील सरकारवर हल्ला केला आहे. त्यांनी, सत्यमेव जयते म्हणतं. माझं नाव एफआयआरमध्ये जाणूनबूझून घेतलं गेल्याचं म्हटलं आहे. तर सरकार हार पचवू शकले नाहीत म्हणून मला, पतीला फसवण्यात आल्याचा दावाही त्यांना केला आहे.

आत्ता आमच्यात हत्तीचं बळ

तसेच त्यांनी म्हटलं आहे की, राज्य शासनाने केलेल्या या कारवाईमुळे आत्ता आमच्यात हत्तीचं बळ आलं आहे. जोर जबरदस्तीचा काही परिणाम होणार नाही, दोन दिवस सर्च केला, सगळं घर सर्च केलं, सगळं कष्टाच्या पैशातून आम्ही हे घेतलं आहे. ते काही लवासाच्या पैशातून घेतलं नाही, असं म्हणत शरद पवार यांच्यालर निशाना साधला आहे.

हे सरकार नापास सरकार

त्याचबरोबर हे सरकार नापास सरकार आहे. सरकार चालवण्याची यांची लायकी नसल्याचे म्हणत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी असं आमचं ठाम मत असल्याचंही त्या म्हणाल्या. तर आपल्या पतीच्या नावातच गुणरत्त आहे. ते गुणी आहेत. त्यामुळे या सरकारला वार्निंग आहे की हे असे प्रकार करू नका. मी स्वातंत्रवीर लक्ष्मणराव पाटलांची कन्या आहे. आम्ही न्यायिक मार्गाने लढू. तर आमच्यासाठी वकिलांची फौज असल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

तर सध्याचे सरकार हे नापास, सरकार आहे. हे सरकार संविधानिक वागत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच असे नाही केले तर मोगलाईसारखे अत्यार राज्यात होत राहतील, असंही अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.