मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरेंमध्ये अर्धा तास बैठक, नेमकी कशावर चर्चा?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली.

मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरेंमध्ये अर्धा तास बैठक, नेमकी कशावर चर्चा?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2025 | 4:52 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाप्रसंगी जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं होतं. फडणवीस यांनी यावेळी विधानभवनात बोलताना उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. तुम्हाला इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान फडणवीसांच्या या ऑफरनंतर आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आल्याचं पाहायला मिळालं.

नेमकी कशावर चर्चा  

आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीला आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना  ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला’ हे पुस्कत देखील भेट दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विरोधी पक्ष नेतेपद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे. 

हर्षवर्धन सपकाळ भेटीसाठी दाखल  

दरम्यान दुसरीकडे आजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.  अंबादास दानवे यांच्या कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. जनसुरक्षा विधेयकाबाबतीत महाविकास आघाडी राज्यपालांची भेट घेण्याचे नियोजन करत असून, याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

दरम्यान दुसरीकडे मुंबईत विजयी मेळावा पार पडल्यानंतर शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मसने प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीसंदर्भात देखील जोरदार चर्चा सुरू आहे, मात्र युतीसंदर्भात राज ठाकरे हे सावध भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.