AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते संविधान परत छापा… बघू कोण विरोध करतं’; राज्यपाल हरिभाऊ बागडे आक्रमक

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठा दावा केला आहे, ते नाशिकमध्ये बोलत होते.

'ते संविधान परत छापा... बघू कोण विरोध करतं'; राज्यपाल हरिभाऊ बागडे आक्रमक
| Updated on: Feb 09, 2025 | 9:55 PM
Share

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीवर महापुरुषांचे फोटो होते, असा दावा त्यांनी केला आहे.  संविधानातून काढून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना बागडे यांनी नाशिकच्या नोटप्रेसमध्ये संविधानाची प्रत इंग्रजीमध्ये छापण्यात आली, त्यानंतर तिथेच हिंदीत त्याचं भाषांतर केल्याचा दाखलाही दिला.

नेमकं काय म्हणाले हरिभाऊ बागडे?

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कार्यक्षम आमदार हा पुरस्कार यावर्षी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना देण्यात आला आहे, या कार्यक्रमात हरिभाऊ बागडे बोलत होते. ‘या वाचनालयानं आशिष शेलार यांना पुरस्कार दिला, त्या निवड समितीचं मी कौतुक करतो. आशिष शेलार हे मोठ्या पदावर जावो अशी प्रार्थना करतो. नाशिकमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे नाशिक आपलंस वाटतं.’  नाशिक शहर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. पण याच ठिकाणाहून सितेचं हरण झालं.  आजही काही घरांमध्ये सीतेला वनवास भोगावा लागतो.

नाशिक शहरात काळाराम मंदिर आहे, त्याच मंदिरात डॉ.बाबसाहेब आंबेडकर येऊन गेले आहेत. मी याच शहरात कुसुमाग्रजांना भेटलो होतो. मी अन्न पुरवठा मंत्री होतो तेव्हा कुसुमाग्रजांना भेटलो होतो, त्यावेळी रेशन कार्डवर त्यांची कविता छापली होती. बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं ते छापलं नाशिकच्या प्रेसमध्ये, इंग्लिशमध्ये होते त्याचं हिंदीमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्या संविधानामध्ये अनेक चित्रं होती, पण ती काढली. आता आपण परत आवाज उठवला पाहिजे. आपण भारत मातेचे पुत्र म्हणून ही मागणी केली पाहिजे, मग बघू कोण विरोध करतं,’ असं यावेळी हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही संघात काम करायचो लोक आम्हाला हिणवायचे. काळ्या टोप्या घालणारे म्हणायचे. मोठा संघर्ष केला आणि आज आम्ही अच्छे दिन पाहतोय. मागच्या पन्नास वर्षांपूर्वी जे पाहिजे होतं ते आम्ही आज पाहात आहोत, असं बागडे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील