Russia Ukraine War | युक्रेन, रशियामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अमरावतीत मदत केंद्र
रशिया-युक्रेन (Ukrain Russia War) या दोन देशामध्ये सध्या युद्ध सुरू आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी (Students) युक्रेनमध्ये अडकले आहेत. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील 10 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्यासाठी मदत केंद्र सुरू झाले आहे.
रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) या दोन देशामध्ये सध्या युद्ध सुरू आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी (Students) युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. तसे प्रयत्न होत आहेत. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील 10 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे. तसेच या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी व त्या विद्यार्थ्यांचा तपशील ठेवण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्रात मदत केंद्र उभारले आहे. या केंद्राच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांशी व त्यांच्या कुटुंबांशी सवांद साधला जात आहे. दरम्यान 24 तास हा कक्ष सुरू राहणार आहे. आज शनिवारी देखील हा कक्ष सुरू होता. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्हाला सूचना मिळाल्या. त्याप्रमाणे काम सुरू झाल्याची माहिती देण्यात आलीय.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

