आजही एक विद्यार्थी दगावला, हिंगोलीत अपघातांची मालिका, वाहन चालकांवर वचक कधी बसणार?

हिंगोलीत मागील दोन दिवसात भीषण अपघात झाले असून यात शाळकरी विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेलाय. भरधाव वेगाने वाहन दामटणाऱ्या चालकांना मात्र त्याचं सोयरसुतक नाही आणि पोलिसांचा वचकही नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जातोय.

आजही एक विद्यार्थी दगावला, हिंगोलीत अपघातांची मालिका, वाहन चालकांवर वचक कधी बसणार?
हिंगोलीत रस्ते अपघातात शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 5:32 PM

हिंगोलीः शाळा आणि महाविद्यालयं ऑफलाइन पद्धतीने सुरु झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे चित्र असले तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र मागील दोन दिवसांच्या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसात वेगवेगळ्या तीन अपघातांत (Accident) तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रस्त्यावरून वाहने चालवणारे नागरिके बेदरकारपणे वाहने दामटवत असल्यानेच मुलांचे बळी गेल्याचा आरोप नागरिक करतायत. तसेच नागरिकांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे.

वसमतमध्ये 11 वर्षीय विद्यार्थी ट्रकखाली सापडला

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे 11 वर्षीय मुलगा शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडत होता. मात्र रस्त्यावरील भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने मोठा अपघात झाला. या घटनेत या चिमुरड्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातील जांभरून येथील हरिभाऊ जुंमडे ह्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जीप व दुचाकी अपघात मृत्यू झालाय.

सावरखेड्यात 10 वर्षीय बालकाचा मृत्यू

तर आज हिंगोली तालुक्यातील सावरखेडा गावचा 10 वर्षीय बालक रस्ता ओलाडून भोजनासाठी जात होता. त्याला बलोनो कारने चिरडल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. या तीन ही घटनात वाहन धारक बेकदरपणे सुसाट वाहने पळवीत होते अशी माहिती आहे. दरवर्षी पोलीस रस्ता सुरक्षा अभियान राबवत असतात पण वर्षभर मात्र पोलिसांना रस्ता सुरक्षा अभियानाचा विसर पडतोय, असंच वाढत्या अपघाताच्या घटनावरून दिसून येते.

इतर बातम्या-

‘परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधण्याची गरज’, दरेकरांकडून सीबीआय चौकशीची मागणी

गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, हेमा मालीनींच्या गालाच्या वक्तव्याने वादात