विधानसभा निवडणुकीनंतर मविआमध्ये महाभूकंप, आतापर्यंत तब्बल इतक्या नेत्यांनी केला महायुतीमध्ये प्रवेश, आकडाच समोर

राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केले, आतापर्यंत महाविकास आघाडीमधील किती नेते महायुतीमध्ये आले? याचा आकडाच आता समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मविआमध्ये महाभूकंप, आतापर्यंत तब्बल इतक्या नेत्यांनी केला महायुतीमध्ये प्रवेश, आकडाच समोर
मविआला धक्का
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 9:11 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र महाविकास आघाडीला हे यश विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर पहायला मिळाला,विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी जोरदार मुसंडी मारली. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, राज्यात महायुतीचा तब्बल 232 जागांवर विजय झाला, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं, दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे, अजूनही महायुतीमध्ये प्रवेश सुरूच आहेत, दरम्यान विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत महाविकास आघाडीच्या निवडणूक लढवलेल्या किती उमेदवारांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे? याचा आकडाच आता समोर आला आहे.

याबाबत नवभारत टाईम्सकडून वृत्त देण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला, अशा एकूण 46 जणांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामध्ये सर्वाधिक प्रवेश हे भाजपमध्ये झाले आहेत. भाजपमध्ये आतापर्यंत 26 जणांनी प्रवेश केला आहे, तर यामध्ये दुसऱ्या क्रमाकांवर राष्ट्रवादी अजित पवार गट असून, या पक्षात 13 जणांनी प्रवेश केला आहे, तर शिवसेना शिंदे गटात सात जणांनी प्रवेश केला आहे, या 46 जागांमध्ये तीन अपक्ष उमेदवारांचा देखील समावेश आहे.

विधानसभेत कोणाला किती जागा?

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं सर्वाधिक जागा जिकंल्या होत्या, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपला या निवडणुकीमध्ये 132 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेना शिंदे गटाला 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला 20 जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 तर काँग्रेसला 16 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तेव्हापासून महाविकास आघाडीला लागलेली गळी अजूनही सुरूच आहे,  सर्वात जास्त इनकमिंग हे भाजपमध्ये झालं आहे.