AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाचे किती खासदार शिंदेंच्या संर्पकात? अखेर आकडा समोर, ठाकरेंकडून वेगवान हालचाली, थेट मातोश्रीवर…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याचा दावा केला जात आहे, आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे किती खासदार शिंदेंच्या संर्पकात? अखेर आकडा समोर,  ठाकरेंकडून वेगवान हालचाली, थेट मातोश्रीवर...
उद्धव ठाकरेंचे किती खासदार एकनाथ शिंदेंच्या संर्पकात? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 7:21 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या माातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत स्वत: अंबादास दानवे यांनी देखील मोठा दावा केला आहे, आमचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आहेत, त्यामुळे जबाबदारी म्हणून त्यांनी ती बैठक बोलावली असेल. परंतु आता मला असं वाटत नाही की ज्या खासदारांनी विचार केला आहे, ते खासदार शिवसेना ठाकरे गटात थांबतील. कारण आता पाणी डोक्याच्या वरून गेलं आहे. त्यामुळे ते सातही खासदार आता लवकरात लवकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा गोगावले यांनी केला आहे, गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

उद्या मातोश्रीवर बैठक

ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये मोठी फूट पडली आहे, आमदारांनंतर खासदारांनी देखील त्यांची साथ सोडली, आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया 

दरम्यान दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी या बैठकीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ही बैठक म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच लोकं आता स्वत:हून पक्षातून बाहेर पडत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरेंना लगावला आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार