AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत बिचुकले यांना निवडणुकीची हौस, किती मतांचा पडला पाऊस?

मूळचे साताऱ्याचे असलेले कंदी पेढ्याचे व्यावसायिक आणि बिग बॉस फेम म्हणून महाराष्ट्रात नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले यांना पुण्यातील कसबा निवडणुकीत मिळालेली मते सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

अभिजीत बिचुकले यांना निवडणुकीची हौस, किती मतांचा पडला पाऊस?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 02, 2023 | 2:55 PM
Share

पुणे : निवडणूक म्हंटलं की अभिजीत बिचुकले ( Abhijit Bichukale ) हे नाव चर्चेत असतं. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूक असो नाहीतर आमदारकीची, अभिजीत बिचुकले हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असतात. उमेदवारी अर्ज दाखल करून ते निवडणुकीत आपलं नशीब आजमावत असतात. त्यामुळे अभिजीत बिचुकले हे चर्चेत येत असतात, नुकतीच पुण्यातील कसबा ( Kasba By election ) पोटनिवडणूक देखील अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी करत लढवली आहे. त्यामध्ये अभिजीत बिचुकले यांनी सुरुवातीपासूनच माझा विजय होणार असा दावा केला होता. मात्र, कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे.

अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडेपर्यन्त चर्चेत होते. मात्र, निकालाच्या दिवशी अभिजीत बिचुकले हे कुठेही निदर्शनास आले नाही. माध्यमांना तर समोरच गेले नाही.

पुण्यातील कसब्याच्या निवडणुकीत खरी लढत भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये होती. मात्र, याच काळात अभिजीत बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून चुरस वाढवली होती. आणि विजयाचा दावाही केला होता.

सध्याच्या राजकारण्यांना लोकं कंटाळली आहे असं सांगत मला जनतेची कामे करायची आहे म्हणत बिचुकले यांनी निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. बिचुकले हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव असून सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा असते.

दरम्यान नुकताच मतमोजणी पार पडली असून त्यामध्ये विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना 74 हजार 284 मतं मिळाली असून पराभूत उमेदवार 62 हजार 244 मतं मिळाली आहे. त्यामध्ये अभिजीत बिचुकले यांना दोन आकडी मतं सुद्धा मिळवता आली नाहीये.

अभिजीत बिचुकले यांना अवघी चार मतं मिळाली असून नोटाला यापेक्षा जास्त मतं आहे. त्यामुळे अभिजीत बिचुकले यांचा सताऱ्यातील कंदी पेढा पुण्यात फिका पडला असल्याची चर्चा होत आहे. याशिवाय बिचुकले यांना निवडणुकीची हौस किती मतांचा पडला पाऊस ? अशीही चर्चा सोशल मिडियावर होत आहे.

अभिजीत बिचुकले यांना अवघी चार मते मिळाली असल्याने कसबा मतदार संघातील निकालानंतर सोशल मीडियासह पुण्यात पेठेत जोरदार चर्चा होऊ लागली असून अभिजीत बिचुकले यांच्यावर मतांच्या ऐवजी भन्नाट प्रतिक्रियेचा पाऊस पडतांना दिसत आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमीच चर्चेत असणारे बिचुकले यांना मिळालेल्या मतांवरूनही बिचुकले चर्चेत आले आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.