Video: ज्यानं सुपरमॅनसारखं जाऊन मुलाचे प्राण वाचवले, त्या मयूर शेळकेनं कसं शक्य केलं अशक्य?

| Updated on: Apr 19, 2021 | 5:10 PM

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून वांगणी स्थानकातील पॉईंट्समन मयूर शेळके याने त्वरित रुळावर उडी मारली आणि धावत जाऊन या मुलाला फलाटावर चढवलं (How Mayur Shelke save child on railway track at vangani railway station).

Video: ज्यानं सुपरमॅनसारखं जाऊन मुलाचे प्राण वाचवले, त्या मयूर शेळकेनं कसं शक्य केलं अशक्य?
मयूर शेळके
Follow us on

अंबरनाथ (ठाणे) : रेल्वेच्या पॉईंट्समनने एका अंध महिलेच्या सहा वर्षीय मुलाचे प्राण वाचवल्याची घटना मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकात घडली. अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. यानंतर या पॉईंट्समनच्या धाडसाचं कौतुक केलं जातंय (How Mayur Shelke save child on railway track at vangani railway station).

नेमकं प्रकरण काय?

वांगणी रेल्वे स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) सायंकाळी एक अंध महिला तिच्या मुलासोबत प्लॅटफॉर्मवरून चालत जात होती. मात्र प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यानं ती चालता चालता अगदी कडेला गेली आणि तिचा मुलगा रेल्वे रुळावर पडला. याच वेळी कर्जतहून मुंबईकडे उद्यान एक्स्प्रेस वांगणी स्थानकात भरधाव वेगात येत होती. या गाडीचा हॉर्न ऐकून अंध मातेनं मदतीसाठी आक्रोश केला.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मयूरने मुलाला वाचवलं

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून वांगणी स्थानकातील पॉईंट्समन मयूर शेळके याने त्वरित रुळावर उडी मारली आणि धावत जाऊन या मुलाला फलाटावर चढवलं. यावेळी त्याच्यापासून उद्यान एक्स्प्रेस ही अवघी काही फुटांवर होती. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मयूरने अंध मातेच्या मुलाला वाचवलं.

‘मयूरला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळावा’

या सगळ्या थरारक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आज समोर आल्यानंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करत मयूरच्या धाडसाचं कौतुक केलं. तसेच मुंबईच्या डीआरएम यांनीही मयूरला पुरस्कार जाहीर करत त्याच्या धाडसाचं कौतुक केलं. या सगळ्यानंतर आपल्याला एका अंध मातेच्या मुलाला वाचवल्याचं समाधान आणि आनंद असल्याचं मयूर याने सांगितलं. तर वांगणीच्या ग्रामस्थांनीही त्याचं कौतुक करत त्याला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली.

मयूरची प्रतिक्रिया काय?

“एक अंध महिला फलटावरुन चालत असताना अचानक तो मुलगा तिच्या हातातून सटकला आणि रेल्वे रुळावर जाऊन पडला. त्याचवेळे मी झेंडा दाखवण्याचं काम करतो. माझ्यासमोर ही घटना घडत असल्याने याशिवाय उद्यान एक्सप्रेम मुंबईच्या दिशेना येताना बघून त्या मुलाला वाचवण्याची जिद्द माझ्या मनात आली. त्या मुलाला वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. मुलाला वाचवण्यात मला यश आलं. याबद्दल मला खूप आनंद झाला. मुलगा सुखरुप असल्याने मला समाधान वाटलं”, अशी प्रतिक्रिया मयूरने दिली (How Mayur Shelke save child on railway track at vangani railway station).

संबंधित बातमी : कोण म्हणतं देवदूत नसतो? अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली, पुढे काय घडलं ते बघा…