Hurricane erin: धोक्याची रात्र! हवामान विभागाचा हाय अलर्ट, 160 किमी वेगाने येतंय महातुफान

Hurricane erin: अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत वादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 85 किमी होता, जो रात्री 11 वाजेपर्यंत ताशी 100 किमीपर्यंत वाढला आहे.

Hurricane erin: धोक्याची रात्र! हवामान विभागाचा हाय अलर्ट, 160 किमी वेगाने येतंय महातुफान
Hurricane erin
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 16, 2025 | 1:39 PM

अटलांटिक महासागरातून येणारे ‘एरिन’ नावाचे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे आजची रात्र धोक्याची ठरु शकते. हवामान खात्याने याबाबत गंभीर इशारा जारी केला आहे, कारण हे वादळ पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये येत्या सात दिवसांत मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज आहे. समुद्रात खोलवर घडणाऱ्या बदलांमुळे वाऱ्यांच्या दिशा अचानक बदलल्या असून, त्यांचा वेगही वाढला आहे. ही संकटाची पूर्वसूचना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वाऱ्याचा वेग आणि धोका

शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत वादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 85 किमी होता, जो रात्री 11 वाजेपर्यंत ताशी 100 किमीपर्यंत वाढला. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, हा वेग 160 किमी प्रति तासापर्यंत वाढण्याचा धोका आहे. हे वादळ इतके शक्तिशाली आहे की, जिथे जाईल तिथे विध्वंस घडवू शकते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा: कुणी उघड्यावर अंघोळ करतं, कुणी टॉयलेटमध्ये खातं… तर सनी लियोनी दर 15 मिनिटाला… सेलिब्रिटिंच्या या घाणेरड्या सवयी वाचून धक्का बसेल

चक्रीवादळ ‘एरिन’चा धोका वाढला

अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने (NHC) शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार, ‘एरिन’ हे वादळ रविवारपर्यंत अती तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळ सध्या लीवर्ड बेटांच्या उत्तरेकडे सरकत असून, येत्या 24 तासांत अँगुइला, सेंट मार्टिन, सेंट बार्थेलेमी, साबा, सेंट युस्टाटियस आणि सिंट मार्टिन या भागांमध्ये उष्णकटिबंधीय वादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कोणत्या भागांना धोका?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ‘एरिन’ हे चक्रीवादळ उत्तर लीवर्ड बेटे, व्हर्जिन बेटे आणि प्यूर्टो रिकोच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रांसह टर्क्स आणि कैकोस तसेच आग्नेय बहामास यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या तरी हे वादळ दक्षिण फ्लोरिडापासून बरेच दूर आहे आणि तिथे धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, फ्लोरिडापासून न्यू इंग्लंड आणि अटलांटिक कॅनडापर्यंतच्या किनारपट्टीवर उंच लाटा आणि धोकादायक रिप करंट्सचा धोका आहे.

प्यूर्टो रिकोवर संकट

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, प्यूर्टो रिकोच्या उत्तरेकडून जाताना ‘एरिन’ अधिक धोकादायक होऊ शकते. रविवारपर्यंत प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन बेटांमध्ये ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच ताशी 50 किमीपेक्षा जास्त वेगाने वाहणारे जोरदार वारे आणि भूस्खलनाचा धोका आहे. या हंगामात एकूण 18 वादळे येऊ शकतात, त्यापैकी 5 ते 9 चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सावधगिरीचा इशारा

हवामान खात्याने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः किनारपट्टीवरील भागात राहणाऱ्या लोकांना वादळाच्या संभाव्य धोक्यांबाबत माहिती ठेवण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.